ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'मी काहीही चुकीचं बोललो नाही; जे सत्य आहे, तेच बोललो – राहुल गांधी

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 14, 2019 05:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'मी काहीही चुकीचं बोललो नाही; जे सत्य आहे, तेच बोललो – राहुल गांधी

शहर : delhi

               नवी दिल्ली - काँग्रेसवाले 'बब्बर शेर' आहेत. देशासाठी जीव द्यायलाही आम्ही तयार आहोत. कोणाच्या दबावाखाली येऊन माफी मागायला मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे,' मी राहुल गांधी आहे,' असा घणाघात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर केला.

               सुधारीत नागरिकत्व कायदा, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, वाढती महागाई, वाढत्या बलात्काराच्या घटनांविरोधात काँग्रेसनं नवी दिल्ली रामलीला मैदानावर 'भारत बचाव' मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना राहुल यांनी अत्यंत आक्रमकपणे सरकारवर हल्ला चढवला. देशातील वाढत्या बलात्काराबद्दल सरकार टीका करताना राहुल यांनी एका सभेत 'मेक इन इंडिया'चा प्रवास 'रेप इन इंडिया'च्या दिशेनं सुरू असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून संसद अधिवेशनात भाजपच्या खासदारांनी राहुल यांना घेरलं होतं. राहुल गांधी यांनी देशातील महिलांचा अपमान केला आहे. त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या खासदारांनी केली होती.

              “जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतात जाऊन पाहा नरेंद्र मोदींनी काय काम केलं. त्यांनी आग लावली. समाजात विभाजनाचे काम त्यांनी केले. तसेच देशाला कमजोर करण्याचे काम मोदींनी केले. पण सर्वांनी एकत्र येऊन देशाला वाचवूया. देशाला कमजोर करण्यापासून वाचवूया. मोदी दररोज टीव्हीवर दिसतात. टीव्हीवर दिसण्यासाठी खूप पैसा खर्च करतात. हा पैसा येतो कुठून”, असाही राहुल गांधी म्हणाले.

               आजच्या भाषणातून राहुल यांनी भाजपला जाहीर उत्तर दिलं. 'मी काहीही चुकीचं बोललो नव्हतो. जे सत्य आहे, तेच बोललो होतो. त्यामुळं माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता घाबरत नाही. नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर भारत बचाओ आंदोलन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते म्हणाले. 

               राहुल गांधी यांनी याआधीही सावरकरांवर टीका केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 'भारतरत्न' देण्यासही काँग्रेसनं विरोध केला होता. आता पुन्हा एकदा राहुल यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मागे

ब्रिटनच्या पंतप्रधान पदी बोरिस जॉन्सन यांची निवड...
ब्रिटनच्या पंतप्रधान पदी बोरिस जॉन्सन यांची निवड...

इंग्लंड - ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या ....

अधिक वाचा

पुढे  

वीर सावरकर यांचा अपमान शिवसेना सहन करणार नाही – संजय राऊत
वीर सावरकर यांचा अपमान शिवसेना सहन करणार नाही – संजय राऊत

            मुंबई - वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नाहीत तर देशाचे दैवत आह....

Read more