ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मी जळगावमधील सिंचन प्रकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी गेला होतो; मी नाराज असल्याची बातमी चुकीचा आहे

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 07:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मी जळगावमधील सिंचन प्रकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी गेला होतो; मी नाराज असल्याची बातमी चुकीचा आहे

शहर : मुंबई

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी एकनाथ खडसे विधानभवनात पोहोचले होते. एकनाथ खडसे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्ध्या तासाहून अधिक जास्त वेळ चर्चा झाली. याआधी एकनाथ खडसे यांनी शरद पवार तसंत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. यामुळे एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी आपण नाराज असल्याची बातमी चुकीची आहे असं स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरेंच्या भेटीमागचं कारण विचारलं असता एकनाथ खडसे यांनी सांगितलं की, “शरद पवार यांची मी जळगावमधील सिंचन प्रकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी गेला होतो. उद्धव ठाकरेंशीही त्याबाबतच चर्चा केली. तसंच १२ तारखेला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांच्याकडून स्वाभिमान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचं निमंत्रण देण्यासाठी मी आलो होतो”.

दरम्यान, त्यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला. गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक औरंगाबाद येथे उभं राहावं यासाठी आपण जमीन उपलब्ध करुन दिली होती. मात्र स्मारक अद्याप उभं राहू शकलेलं नाही. या स्मारकासाठी जास्त नाही ३० ते ४० कोटींचा खर्च आहे. मी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या माध्यमातून घोषणा व्हावी अशी विनंती केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

“उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली आहे. आम्ही प्राधान्याने स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. तसंच आवश्यकता असेल तर तिथला दौरा असेल त्यावेळी जागेला भेट देऊ असंही ते म्हणाले आहेत,” अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

यावेळी त्यांनी आपण नाराज असल्याची बातमी चुकीची असल्याचं सांगितलं. “काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यामधील नेत्यांशी जवळीक आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता आल्यास आपल्याला फायदा होईल असं त्यांना वाटत असावं. पण याबाबत मी कोणताही निर्णय घेतलेला नसून मी नाराज असल्याची बातमी चुकीची आहे,” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं.
 

मागे

 १६ डिसेंबरपासून विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होणार..
१६ डिसेंबरपासून विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होणार..

१६ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होणार आहे. अधि....

अधिक वाचा

पुढे  

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त; राजू शेट्टी यांची घोषणा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त; राजू शेट्टी यांची घोषणा

महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी....

Read more