By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 08, 2020 08:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या (US Election) निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना कडवी झुंज देणारे जो बायडन (Joe Biden) या निवडणुकीत 279 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर ट्रम्प यांना अवघे 214 मते मिळाली आहेत. या विजयाबरोबरच बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मतमोजणी सुरु होती. अखेर भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 10 च्या सुमारास जो बायडन विजयी झाल्याचं अमेरिकन वृत्तसंस्थांनी जाहीर केलं. पेनसिल्वेनिया या राज्यात बायडन यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर बायडन यांचा विजय जाहीर केला गेला. सीएनएन या अमेरिकन वृत्तसंस्थेने जो बायडन यांचा लवकरच शपथविधी होणार असल्याचंही वृत्त दिलं आहे.
मतमोजणी सुरु झाल्यापासून जो बायडन यांनी चांगलीच आघाडी घेतली होती. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकूण मतमोजणीत पिछाडीवर पडल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी न्यायालयीन लढाईची देखील भाषा केली. आज अखेर दोन दिवसांच्या मतमोजणीनुसार बायडन महासत्तेचे महासत्ताधीश म्हणून ओळखले जाणार आहेत.
जो बायडन शुक्रवारी जॉर्जिया आणि पेन्सिलवेनिया या महत्त्वाच्या राज्यांत त्यांचे प्रतिस्पर्धी आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे होते. अखेर या दोन्हीही राज्यांत बायडन यांनी ट्रम्प यांना पराभूत केलं आहे. जो बायडन यांच्याबरोबर कमला हॅरिस देखील अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्या आहेत. अमेरिकेच्या पहिल्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्षा म्हणून त्यांच्या नावे विक्रम प्रस्थापित झाला आहे.
America, I’m honored that you have chosen me to lead our great country.
— Joe Biden (@JoeBiden) November 7, 2020
The work ahead of us will be hard, but I promise you this: I will be a President for all Americans — whether you voted for me or not.
I will keep the faith that you have placed in me. pic.twitter.com/moA9qhmjn8
“अमेरिकेसारख्या महासत्ताधीश देशाचं नेतृत्व करण्याची अमेरिकेच्या जनतेने मला संधी दिली. अमेरिकन जनतेने केलेला हा माझा सन्मान आहे. जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. तुमचा विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेन”, असं ट्विट करत निकालानंतर जो बायडन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करुन मराठा तरुणांचा विश्वासघा....
अधिक वाचा