ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक, जे पी नड्डा संबोधित करणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 27, 2020 01:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक, जे पी नड्डा संबोधित करणार

शहर : मुंबई

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भाजपच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची बैठक होणार आहे. नड्डा दिल्लीतून बैठकीत सहभागी होतील, तर मुंबईत नसलेले सर्व नेतेही या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहतील.

भाजपची राज्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा, उद्धव ठाकरेंनी सरकार पाडून दाखवण्याबाबत दिलेले आव्हान, महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेली टीका आणि राज्यातील कोरोनाची स्थिती या पार्श्वभूमीवर बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे.

महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारिणीत कोण कोण?

प्रमुख कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत. कार्यकारिणीचे सदस्य 69 असतील, तर निमंत्रित सदस्य 139 जण असतील. सर्व आमदार-खासदार कायम सदस्य असतात.

नागपूरचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महामंत्री आहेत. आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, श्रीकांत भारती महामंत्री आहेत. विजय पुराणिक महामंत्री संघटक आहेत.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालेलं नाही. त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. महत्त्वाचं म्हणजे राज्यात पंकजा मुंडे यांना मोठी जबाबादारी दिली जाईल असं म्हटलं जात होतं, मात्र त्यांच्याऐवजी खासदार प्रीतम मुंडे यांना राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

भाजपची कार्यकारिणी

महामंत्री सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक

उपाध्यक्षमाजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकुर असे 12 उपाध्यक्ष

सेक्रेटरीमाजी आमदार प्रमोद जठार, , संजय पुराम, अॅड धर्मपाल मेश्राम, खासदार रक्षा खडसे, संदीप लेले, स्नेहलता कोल्हे, दयानंद चोरगे, इंद्रिस मुलतानी, अमित गोरखे, नागनाथ निरोवदे, राजेंद्र बकाने, अर्चना तेहटकर

विधानसभेत मुख्य प्रतोद आशिष शेलार आणि प्रतोद माधुरी पिसाळ

मागे

माझ्या मतदारसंघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं, पण कोरोना संकटात डॉक्टर हाच देव : जयंत पाटील
माझ्या मतदारसंघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं, पण कोरोना संकटात डॉक्टर हाच देव : जयंत पाटील

“कोरोनामुळे लोकांना लक्षात आलं की देव वाचवू शकत नाही, तर डॉक्टर हाच खरा दे....

अधिक वाचा

पुढे  

पुण्याची परिस्थिती हाताबाहेर, मुख्यमंत्र्यांचा दौरा हे उशिरा सुचलेलं शहाणपण, भाजप शहराध्यक्षांची टीक
पुण्याची परिस्थिती हाताबाहेर, मुख्यमंत्र्यांचा दौरा हे उशिरा सुचलेलं शहाणपण, भाजप शहराध्यक्षांची टीक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुरुवारी (30 जुलै) पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत....

Read more