ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेनेच्या बंडखोर कार्यकर्त्यांना मारहाण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 12:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेनेच्या बंडखोर कार्यकर्त्यांना मारहाण

शहर : सोलापूर

करमाळ्यात मतदानला गालबोट लागलंय. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली. शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांनी असा आरोप केलाय.या मारहाणीत नारायण पाटलांचे कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत. कार्यकर्त्यांच्या डोक्यात मारहाण झाल्याने कार्यकर्ता जखमी झाला.

बाळु जगताप, बापुराव जगताप, संतोष देवकर, पिंटु जगताप, औंदुबर खोचरे, गणेश जगताप,अनिल जगताप, सुभाष जगताप या कार्यकर्त्यांना जबर मारहाण चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. जखमी वर टेंभुर्णी येथे उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलीय.

आज राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारचं भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे. राज्यात शांततेत मतदान पार पडावे म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर गडचिरोलीसारख्या संवेदनशील मतदान केंद्रांवर दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान पार पडेल. मतदानकेंद्रांवर मोठी लगबग सुरु असून जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दिव्यांगांसाठी विशेष सोय करण्यात आलीय. दरम्यान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव दल, गुजरात राज्य राखीव दलाचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुर्गम भागासाठी वायरलेस सेट तसेच संवेदनशील केंद्राच्या टेहाळणीसाठी ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे.

 

मागे

'आघाडी'च्या उमेदवारावर चाकू हल्ला करत त्यांची कारही जाळून टाकली
'आघाडी'च्या उमेदवारावर चाकू हल्ला करत त्यांची कारही जाळून टाकली

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदार संघात कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या विर....

अधिक वाचा

पुढे  

मनोहर जोशींनी दिला शिवसेना-भाजपला घरचा अहेर
मनोहर जोशींनी दिला शिवसेना-भाजपला घरचा अहेर

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी भाज....

Read more