ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कौन बनेगा मुख्यमंत्री?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 11, 2019 03:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कौन बनेगा मुख्यमंत्री?

शहर : मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून भाजपा-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच रंगणार आहे. सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत त्याची झलक पाहायला मिळतेय. कौन बनेगा मुख्यमंत्रीचा खेळ सुरू झालाय.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेनेत जोरदार चुरस रंगणार आहे आणि ही स्पर्धा असणार आहे ती मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी... भाजपानं आधीच देवेंद्र फडणवीस यांच्या शिरावर मुख्यमंत्रिपदाचा ताज ठेवलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपा अध्यक्ष अमित शाहांपर्यंत सर्वांनीच मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय.

तर दुसरीकडं उद्धव ठाकरेंनीही चमत्कार घडवण्याची भाषा सुरू केलीय. आमचा नेता ठरलाय, असंही ते सांगत आहेत. आता उद्धव ठाकरेंनी ठरवलेला नेता कोण? हे कळायला जनता काही दुधखुळी नाही. 'हीच ती वेळ' म्हणत शिवसेनेनं आदित्यला मुख्यमंत्री बनवण्यासाठी कंबर कसलीय तर दुसरीकडं मी परत येईन म्हणत देवेंद्र फडणवीसही रिंगणात उतरलेत. आता यांच्यापैंकी कोण बाजी मारणार? घोडा-मैदान फार दूर नाही. येत्या २४ ऑक्टोबरला फैसला समोर येईलच.

मागे

'अजून मला पुरते ओळखलेले नाही, फटका कधी मारला समजणारही नाही'
'अजून मला पुरते ओळखलेले नाही, फटका कधी मारला समजणारही नाही'

शरद पवार यांनी अजून मला पुरते ओळखलेले नाही. मी कधी फटका लगावेन, हे त्यांना सम....

अधिक वाचा

पुढे  

भाजपाचा हाच युतीधर्म आहे का? शिवसेनेविरोधातील भाजप बंडखोरांवर कारवाई करा
भाजपाचा हाच युतीधर्म आहे का? शिवसेनेविरोधातील भाजप बंडखोरांवर कारवाई करा

विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्यांवर भाजपने ....

Read more