ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लोकसभा निवडणूक २०१९ : आज काँग्रेसचा जाहीरनामा राहुल गांधी करणार प्रसिद्ध

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 02, 2019 11:22 AM 2019-02-12T14:15:30+5:30

लोकसभा निवडणूक २०१९ : आज काँग्रेसचा जाहीरनामा राहुल गांधी करणार प्रसिद्ध

शहर : मुंबई

लोकसभा निवडणूक २०१९ साठी काँग्रेस आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. दुपारी १२ वाजता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी घोषणापत्र प्रकाशित करतील. घोषणापत्रात न्याय योजनेवर भर राहील. तसंच पक्षांतर कायद्यातही बदल करण्याचं आश्वासन काँग्रेस जाहीरनाम्यातून देण्याची शक्यता आहे. याशिवाय सरकारी नोकऱ्या, निमलष्करी दलांसाठी महत्त्वपूर्ण आश्वासन, महिला आरक्षण, जीएसटीत बदल हे मुद्देही जाहीरनाम्यात असतील अशी शक्यता आहे

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करतील. यावेळी काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष पी चिदंबरम आणि इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित असण्याची शक्यता आहे. या घोषणापत्रात काँग्रेसच्या 'न्याय' आणि स्वास्थ्य अधिकाराच्या घोषणांचाही उल्लेख असेल. काँग्रेसनं आधीच जाहीर केलेल्या 'न्याय' योजनेनुसार समाजातील गरिबांना वार्षिक ७२,००० रुपये देण्याची घोषणा करण्यात आलीय. यासाठी देशातील पाच करोड सर्वात कुटुंबांना मासिक ६००० रुपये दिले जातील. तसंच शेतकऱ्यांना कर्ज माफी तसंच दलित आणि ओबीसी समुदायासाठी अनेक घोषणा या जाहीरनाम्यात असू शकतील.   

मागे

Loksabha 2019: वर्ध्यात मैदान मोकळे असतानाही मोदी म्हणाले…
Loksabha 2019: वर्ध्यात मैदान मोकळे असतानाही मोदी म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्ध्यातील सभेत गर्दी खेचून आणण्यासाठी भा....

अधिक वाचा

पुढे  

'भारतीय लष्कर' ही नरेंद्र मोदींची सेना, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी अडचणीत
'भारतीय लष्कर' ही नरेंद्र मोदींची सेना, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी अडचणीत

भारतीय लष्कर हे ‘नरेंद्र मोदी यांची सेना आहे’ असं वादग्रस्त वक्तव्य उत्....

Read more