ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

विरोधी पक्षात बसण्याची आमची तयारी - अजित पवार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 01, 2019 11:24 AM 2019-02-12T14:15:30+5:30

विरोधी पक्षात बसण्याची आमची तयारी - अजित पवार

शहर : मुंबई

विरोधी पक्षात बसायची आमची मानसिकता झाली आहे आणि तशी तयारी सुरु असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या घरी गुरुवारी रात्री राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि इतरही नेते या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेसचे नेते राज्यात शिवसेनेसह सरकार स्थापन करायला सकारात्मक आहेत. याबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनीही सकारात्मक भूमिका घेतली तर काय करायचं? यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीची ही बैठक झाली.

एकीकडे काँग्रेस नेते शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव घेऊन दिल्ली गाठत असताना दुसरीकडे काल सकाळी संजय राऊत यांनी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. काल संजय राऊत यांनी 'सिल्वर ओक' हे निवासस्थान गाठलं. मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं राऊत यांचं म्हणणं आहे. ही सदिच्छा भेट असल्याचं संजय राऊत यांनी मीडियासमोर म्हटलं. मात्र एकूण शिवसेना भाजपाच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर पवारांशी झालेल्या राऊतांच्या भेटीला प्रचंड महत्त्व आहे.

दरम्यान, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीतल्या हालचालींना वेग आलाय. शिवसेनेला सरकार स्थापण्यासाठी मदत करता येईल का अशी चाचपणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातले काँग्रेस नेते दिल्लीला दाखल झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींशी आज चर्चा करणार आहेत. त्यामुळे सोनिया गांधी याबाबत काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.

मागे

'शिवसेना दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करु शकते' - संजय राऊत
'शिवसेना दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करु शकते' - संजय राऊत

शिवसेना आवश्यक बहुमताची जुळवाजुळव करून सरकार स्थापन करू शकते, असा दावा खास....

अधिक वाचा

पुढे  

'शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आणि नेते मंत्रीपदाच्या शर्यतीत मश्गूल'
'शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आणि नेते मंत्रीपदाच्या शर्यतीत मश्गूल'

शिवसेनेचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी सरकारला घरचा अहेर दिला आहे. विद....

Read more