ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

अण्णांच्या राळेगणसिद्धीत कुणाची सत्ता?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 18, 2021 01:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अण्णांच्या राळेगणसिद्धीत कुणाची सत्ता?

शहर : अहमदनगर

पाटोद्यात आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनलाचा पराभव झाल्यानंतर भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे अण्णा हजारे यांच्या गावात म्हणजेच राळेगणसिद्धीमध्ये कोण जिंकणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. त्यानंतर अण्णांच्या  विचारांच्या ग्रामविकास पॅनलने राळेगणसिद्धीमध्ये सर्वच्या सर्व 7 जागा जिंकल्याचे समोर आले आहे.

राज्यात 12,711 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी होत असली तरी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे पटोदा, पोपटराव पवारांचे हिवरेबाजार, आणि ज्येष्ठ जमाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी या तीन गावांच्या निवडणुकीची सर्वत्र चर्चा रंगली होती. नेहमीच चर्चेत असणाऱ्या या गावांमध्ये कोणाची सत्ता येणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. त्यातंनर आत प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यांनतर सर्व चित्र स्पष्ट झाले आहे. या गावांपैकी पाटोद्यात सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचा पराभव झाला. तर हिवरे बाजारातून पोपटराव पवार यांचं पॅनल जिकंलं आहे. यानंतर राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या समर्थकांनी सत्ता कायम राखत येथील ग्रामपंचायतीवर विजयी पतका फडकवली आहे.

अण्णा समर्थकांचा पूर्ण जागांवर विजय

राळेगणसिद्धी या गावात एकूण 9 सदस्यांची ग्रामपंचायत आहे. यापैकी 2 जागांवर याआधीच बिनविरोध निवडणूक झाली. 16 जानेवारी रोजी बाकीच्या 7 जागांवर निवडणूक झाली. त्यांनतर आज प्रत्यक्ष निकाल समोर आले आहेत. या सातही जागांवर अण्णा हजारे यांच्या समर्थकांच्या राळेगणसिद्धी ग्रामविकास पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवला आहे.

राळेगणसिद्धीमध्ये विजयी झालेले उमेदवार

1) जयसिंग मापारी

2) मंगल पठारे

3) मंगल मापारी

4) लाभेष औटी

5) सुनीता गजरे

6) डॉ. धनंजय पोटे

7) मंगल उगले

पाटोद्यात भास्करराव पेरे पराभूत

आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या पोटोद्यात भास्करराव पेरे यांच्या पॅनलचा पराभव झाला. येथील ग्रामपंचायतीत एकूण 11 जागांपैकी 8 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित तीन जागांसाठी निवडणूक झाली होती. मात्र या तिन्ही जागांवर भास्कर पेरे यांचे पॅनल पराभूत झाले. येथील 11 जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांच्या पॅनलने विजय मिळवून भास्करराव यांच्या 30 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला.

मागे

विखेंच्या भाचीने करुन दाखवलं, राष्ट्रवादीच्या आमदाराची दहा वर्षांची सत्ता खालसा
विखेंच्या भाचीने करुन दाखवलं, राष्ट्रवादीच्या आमदाराची दहा वर्षांची सत्ता खालसा

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्र....

अधिक वाचा

पुढे  

महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंची भेट, पवारांनाही भेटणार
महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंची भेट, पवारांनाही भेटणार

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फड....

Read more