ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

चंद्रकांतदादा, विखे-पाटील, राणेंना धक्का; भाजपच्या दिग्गजांनी गावातल्या ग्रामपंचायती गमावल्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 18, 2021 12:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चंद्रकांतदादा, विखे-पाटील, राणेंना धक्का; भाजपच्या दिग्गजांनी गावातल्या ग्रामपंचायती गमावल्या

शहर : कोल्हापूर

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे अत्यंत धक्कादायक निकाल हाती येत आहेत. या निवडणुकीत भाजपच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीही राखता आल्यान नाहीत. तर भाजप नेते नितेश राणे आणि राम शिंदे यांच्या हातूनही ग्रामपंचायत निसटल्या आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

कोल्हापुरातील खानापूर हे चंद्रकांत पाटील यांचं मूळगाव आहे. पण खानापूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेने 9 पैकी 6 जागा जिंकल्या आहेत. अजून तीन जागांची मतमोजणी सुरू आहे. शिवसेना नेते प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या घरातच पराभूत केल्याने पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. या निमित्ताने भाजपला नाकारण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचंही बोललं जात आहे.

विखेंची 20 वर्षांची सत्ता गेली

नगरमध्ये लोणी खुर्द हे भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांचं गाव आहे. या गावातील ग्रामपंचायतीवर गेल्या 20 वर्षांपासून विखे-पाटलांची सत्ता होती. मात्र, या ग्रामपंचायतीच्या 17 पैकी 13 जागा जिंकून परिवर्तन पॅनलने विखे-पाटलांना धोबीपछाड केलं आहे. राधाकृष्ण विखे-पाटील स्वत: भाजपचे आमदार आहेत. त्यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील हे खासदार आहेत. असं असतानाही विखे-पाटलांना स्वत:च्या गावातच पराभव पत्करावा लागल्याने विखेंच्या सत्तेला उतरती कळा लागल्याचं बोललं जात आहे.

राणेंना धक्का

भाजपला आणि आमदार नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला धक्का बसला आहे. कणकवली तालुक्यातील भिरंवडे ग्रामपंचायतचा पहिला निकाल हाती आला आहे. भिरवंडे ग्रामपंचायतीत 7 पैकी 4 जागा बिनविरोध निवडून आणण्यात शिवसेनेला यश आले आहे. त्याशिवाय कणकवली तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेनेकडे तर एक भाजपकडे गेली आहे. तालुक्यातील भिरवंडे गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे तर तोंडवली-बावशी ग्रामपंचायत भाजपकडे आली आहे. कणकवली हा नितेश राणेंचा मतदारसंघ असून राणेंसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

राम शिंदेंच्या गटाचा पराभव

अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील चौंडी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात 9 पैकी 7 जागा जिंकण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. तर भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या गटाला केवळ दोनच जागा मिळाल्या आहेत. राम शिंदे यांनी सुरुवातीपासूनच रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत पवार यांनी काम सुरू ठेवल्याने मतदारांनी त्यांच्या बाजूने कौल दिल्याचं दिसून आलं आहे. हा पराभव शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

 

मागे

पीएम केअर फंडशी निगडीत माहिती सार्वजनिक करा, 100 माजी नोकरशहांचं पंतप्रधानांना पत्र
पीएम केअर फंडशी निगडीत माहिती सार्वजनिक करा, 100 माजी नोकरशहांचं पंतप्रधानांना पत्र

पीएम केअर पंडचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 100 माजी नोकरशहांनी पंतप्र....

अधिक वाचा

पुढे  

धनंजय मुंडेंचा परळीत विजयी षटकार, 8 पैकी 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची टिक टिक
धनंजय मुंडेंचा परळीत विजयी षटकार, 8 पैकी 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची टिक टिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) या....

Read more