ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

सत्ता आल्यास निवडणूक आयोगालाच कारागृहात टाकू

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: एप्रिल 04, 2019 04:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सत्ता आल्यास निवडणूक आयोगालाच कारागृहात टाकू

शहर : यवतमाळ

पुलवामा हल्ल्यात ४० सैनिक गमावल्यानंतरही बेजबाबदार पंतप्रधान मोदींना पुन्हा सत्ता देणार का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. यासोबतच पुलवामा घटनेबद्दल बोलण्यास मनाई करणाऱ्या निवडणूक आयोगाला आमची सत्ता आल्यास दोन दिवस कारागृहात टाकू, असे खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. यवतमाळच्या दिग्रस येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत आंबेडकर बोलत होते. निवडणूक आयोग भाजपाचे हस्तक म्हणून काम करीत असल्याचा घणाघाती आरोपदेखील त्यांनी केला. प्रकाश आंबेडकरांनी आपल्या भाषणात भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षावर सडकून टीका केली. 'या दोन्ही पक्षाला सत्तेपासून दूर ठेऊन डाव्यांच्या आणि वंचित आघाडीच्या हाती सत्ता द्या' असे आवाहन त्यांनी केलं. 

पुलवामा हल्ल्यात ४० सैनिकांचा जीव गेला... अशा बेजबाबदार पंतप्रधानांना आणि सेना-भाजप सरकारला पुन्हा सत्ता द्यायची का? हे सैन्याचाही बळी द्यायला निघालेत... आणि निवडणूक आयोग म्हणतं पुलवामाबद्दल बोलायचं नाही...  आम्ही बोलणारच... आम्हाला बोलण्याचा अधिकार संविधानानं दिलाय, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांसमोर केलं.

शिवाय आम्ही सत्तेत आल्यावर केजी टू पीजी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाची असेल आाणि आरएसएस तुरुंगात असेल, असेही ते म्हणाले. 

 

मागे

'मातोश्री' ला टार्गेट करणारे किरीट सोमय्या यांचा पत्ता कट
'मातोश्री' ला टार्गेट करणारे किरीट सोमय्या यांचा पत्ता कट

सातत्याने शिवसेनेवर टीका करणारे आणि थेट 'मातोश्री' ला टार्गेट करणारे खास....

अधिक वाचा

पुढे  

२०२० पर्यंत जम्मू-काश्मीर भारतात नसेल- मेहबूबा मुफ्ती
२०२० पर्यंत जम्मू-काश्मीर भारतात नसेल- मेहबूबा मुफ्ती

पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू- काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्....

Read more