By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 29, 2019 05:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : यवतमाळ
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या घरातील मनोहर नाईक आणि त्यांचे पुत्र इंद्रजीत नाईक हे दोघेही लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे विदर्भात राष्ट्रवादीला कॉंग्रेसला मोठे भागदाड पडल्याचे मानले जात आहे. कारण मनोहर नाईक हे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आहेत. शिवाय ते राष्ट्रवादीचे विदर्भातील एकमेव आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे ते बंधु आहेत. उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी या पितापूत्रांची बैठक होणार आहे. त्यानंतर त्यांचा शिवसेनेतील प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होईल, असे सांगितले जात आहे.
कॉंग्रेस जेडिएस सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यानंतर कर्नाटकामध्ये....
अधिक वाचा