ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माझ्याविरोधात कटकारस्थाने करणाऱ्यांना मी जेलमध्ये धाडल्याशिवाय शांत बसणार नाही - छगन भुजबळ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 02:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

माझ्याविरोधात कटकारस्थाने करणाऱ्यांना मी जेलमध्ये धाडल्याशिवाय शांत बसणार नाही - छगन भुजबळ

शहर : नाशिक

माझ्यावर आणि समीर भुजबळ वर केलेले आरोप सर्व खोटे असुन त्याबाबतचा तसा अहवाल न्यायालयाकडुन तर येईल. मग त्यानंतर मात्र माझ्याविरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना मी जेल मध्ये धाडल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे झालेल्या जाहीर देत भाजपचा चांगलाच समाचार घेतला.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, कॉग्रेस मित्रपक्षांच्या सयुंक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ सिन्नर तालुक्यातील ठाणगांव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार वैभव पिचड, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, भगीरथ शिंदेजयवंतराव जाधव कोंडाजीमामा आव्हाड, गजानन शेलार, बलदेव शिंदे, निवृत्ती अरिंगळे, बाळासाहेब वाघ,विनायक सांगळे, जयराम शिंदे, नामदेव कोतवाल, जयराम शिंदे, रवी काकड, विलास सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की,प्रत्येकजण स्वत:ला विकासपुरुष, कार्यसम्राट म्हणून घेत असतांना सिन्नर तालुक्यात १० वर्षे आमदारकी काळात तुम्ही स्वतः काय विकास केला असा सवाल करत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याचा विकास जर कुणी केला असेल तर

तो फक्त मी आणि समीर भुजबळ यांच्या निधीतुन विकास केला आहे असे सांगत एक बस स्टँड बांधुन त्याचे गाळे भाड्याने देऊन किंवा विकुन आपली दुकानदारी केलेली नाही. सिन्नरच्या विकासासाठी समीर भुजबळ यांनी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे कुणीही खोटे बोलु नये असे सांगून कोकाटेवर चांगलेच तोंडसुख घेतले.पिंपळगांव येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात नाशिकला आल्यानंतर मला सप्तरंगाचे स्मरण होत आहे असे सांगत या सप्तरंगाचे श्रेय लाटत आहे पण मोदींना माहीत नाही की सप्तरंगासाठी समीर भुजबळ आणि मी स्वतः कोट्यावधी रुपयांचा निधीकेंद्र आणि राज्यातुन निधी उपलब्ध करुन दिला आहे. या सप्तरंगाचे श्रेय कुणीही घेऊ शकत नाही आणि मोदीसाहेब तुम्ही कितीही खोटे बोला पण यावेळी तुमची काही खैर नाही असा टोलाही त्यांनी लगावला.ते म्हणाले की, मोदींना मी आव्हान करतो की, आपल्या पाच वर्षातशेतक-यांनी आत्महत्या केल्या नाही, नोटबंदीमुळे नागरीक आनंदीत झाले आहेत शेतक-यांचे पैसे दिले असे मला जाहीर सभेत लेखी स्वरूपात दाखवावे यात जर सत्यता आढळून आली तर मी स्वतः समीर भुजबळ यांची उमेदवारी मागे घेतो असे सांगत सिन्नर तालुक्यातील पाणी प्रश्न, शेतीचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न आणि रोजगाराचा प्रश्न सोडविण्याची ताकद फक्त आणि फक्त समीर भुजबळच करु शकतात असे ठामपणे सांगितले.

ज्यांनी माझ्या विरोधात कटकारस्थान करुन माझ्यावर खोटी कारवाई केली यात मी शंभर टक्के निर्दोष आहे. त्याबाबतचा न्यायालयाकडून लवकरच तसा दाखला येईलच त्यानंतर मग मात्र मी माझ्या विरोधात कारस्थान करणा-याना मी जेल मध्ये धाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मागे

दिल्लीत भाजपाला हादरा, उमेदवारी न मिळाल्याने विद्यमान खासदार काँग्रेसमध्ये...
दिल्लीत भाजपाला हादरा, उमेदवारी न मिळाल्याने विद्यमान खासदार काँग्रेसमध्ये...

भाजपाने दिल्लीतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून गायक हंसराज यांना उमेदवारी द....

अधिक वाचा

पुढे  

शरद पवार यांना EVM हॅकिंगचा संशय, त्याना पराभव दिसू लागलाय - भाजपची टीका
शरद पवार यांना EVM हॅकिंगचा संशय, त्याना पराभव दिसू लागलाय - भाजपची टीका

"सध्या भाजपच्या विरोधात लाट आहे, पण EVM हॅक करून मतदान प्रक्रियेवर परिणाम के....

Read more