ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

मनसेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची निवड

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 23, 2020 12:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मनसेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची निवड

शहर : मुंबई

       मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाअधिवेशन आज पार पडत असून यावेळी अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करीत असल्याची घोषणा केली. ‘अमित ठाकरे यांना जबाबदारी मिळणार का, हे सातत्यानं विचारलं जात होतं. त्यामुळे अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करावी, असा ठराव मी मांडत आहे. तो आपल्या मान्य असल्यास उभं राहून पाठिंबा द्यावा’ असं बाळा नांदगावकर म्हणाले. यावेळी अमित ठाकरे यांनी वडील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. 

       ‘मला ही संधी दिल्याबद्दल राजसाहेबांचे धन्यवाद. मी आज ठराव मांडणार आहे, हे काल संध्याकाळी सांगितलं, त्यामुळे पायाखालची जमीन सरकणं काय असतं, याची कल्पना आली. येत्या २ महिन्यात पक्षाला १४ वर्ष पूर्ण होतील. १४ वर्षात मनसेचं पहिलंच अधिवेशन झालं. २७ वर्षात पहिल्यांदाच मी व्यासपीठावर बोलतोय. त्यामुळे हा आयुष्यातील खूप मोठा दिवस आहे’ असं म्हणत अमित ठाकरे यांनी ठराव मांडला.

 

   

     ‘परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संपूर्ण शिक्षण पुनर्रचना होणे जरुरीचे आहे. लहान मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्याची त्वरित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात जागतिक गुणवत्तेचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी क्रीडा विद्यापीठ होणे अतिशय आवश्यक आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण सुरु करायला हवे. हा ठराव मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मांडत आहे’ असा ठराव अमित ठाकरे यांनी मांडला.

     महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळासह अनेकांना या झेंड्याविषयी उत्सुकता होती. अखेर आज या झेंड्याचे अनावरण झाले. भगव्या रंगाच्या या झेंड्यावर शिवरायांच्या राजमुद्रेची प्रतिमा आहे. राज ठाकरे यांनी या झेंड्याचे अनावरण केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

मागे

राज ठाकरेंकडून मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण 
राज ठाकरेंकडून मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण 

      मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्ष....

अधिक वाचा

पुढे  

एकातेरिनी ठरल्या ग्रीसच्या पहिल्या महिला राष्ट्रपती 
एकातेरिनी ठरल्या ग्रीसच्या पहिल्या महिला राष्ट्रपती 

       ग्रीस - संसदेने बुधवारी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपत....

Read more