ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

ED मुळे लाव रे तो व्हिडिओ बंद झाला? राज ठाकरेंनी दिलं उत्तर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 14, 2019 07:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ED मुळे लाव रे तो व्हिडिओ बंद झाला? राज ठाकरेंनी दिलं उत्तर

शहर : मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या आपल्या पक्षासाठी महाराष्ट्रभर प्रचारसभा घेत आहेत. मात्र यावेळीच्या सभांमध्ये राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत वापरलेलं 'लाव रे तो व्हिडिओ'चं तंत्र दिसत नाही. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची कोहिनूर मिलप्रकरणी झालेली ईडीची चौकशी हे त्यामागचं कारण आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत आता स्वत: राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

'माझ्या ईडीच्या चौकशीचा आणि आताच्या सभेमध्ये व्हिडिओ दाखवण्याचा काहीही संबंध नाही. मी ईडी-बिडीला भीक घालत नाही. पण प्रत्येक वेळी त्याच त्याच गोष्टी मी करत नाही,' असं म्हणत राज ठाकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात ईडीबाबतचे आरोप फेटाळले आहेत. तसंच ज्या प्रकरणी मला ईडीची नोटीस आली त्या प्रकरणातील व्यवहार कोणत्याही सीए किंवा वकिलांनी तपासले तरी त्यांना कळतील, त्यात काहीही नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

'लावरे तो व्हिडिओचा पार्ट 2 दिसू शकतो'

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी अखेरच्या टप्प्यात सभा घेऊन राज्यभरात सरकारविरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या लाव रे तो व्हिडिओची चांगलीच चर्चाही झाली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणूक प्रचारातही हा पॅटर्न दिसू शकतो. कारण राज ठाकरे यांनीच याबाबतचे संकेत दिले आहेत.

'लोकसभा निवडणुकीत व्हिडिओच्या वापरामुळे तुमचा प्रचार प्रभावी झाला होता. पण आता तुम्ही त्याचा वापर करताना दिसत नाही,' असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, 'माझ्या अजून काही सभा बाकी आहेत. मोदी जसं खूप काही बोलले होते तसं मुख्यमंत्रीही बोलले आहेत. त्यामुळे माझ्या पुढील सभांमध्ये कदाचित पुन्हा लावरे तो व्हिडिओ दिसू शकतो.'

 

 

मागे

'पोट भरलेले पवार १० रुपयांच्या जेवणावर टीका करतात'; उद्धव ठाकरेंचा टोला
'पोट भरलेले पवार १० रुपयांच्या जेवणावर टीका करतात'; उद्धव ठाकरेंचा टोला

महाराष्ट्रात सत्ता आली तर १० रुपयांमध्ये जेवण देणार असल्याची घोषणा शिवसेन....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला
शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाला आहे. उस्मानाबा....

Read more