By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 23, 2019 10:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच काही नेत्यांनी जल्लोष केला. यासंदर्भात आता कारवाई झाल्याचेही पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड दापोलीचे उमेदवार संजय कदम यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजय कदम यांच्यासह पत्नी सायली कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय कदम हे 21 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी शहरातून मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी कदम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना मिरवणुक काढू नये असे सांगितले. मात्र संजय कदम यांनी मिरवणुक काढली. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कलम 143, 147, 149, 268, 290 अन्वये संजय कदम यांच्यावर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांची पत्नी सायली कदम यांच्यावरही खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
बहुजन विकास आघाडीचे (बविआ) सर्वेसर्वा आणि वसई-विरार मतदारसंघाचे आमदार हिते....
अधिक वाचा