ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

..मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही, नवनीत राणांचा सरकारला इशारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 04, 2020 10:15 AM 2019-02-12T14:15:30+5:30

..मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही, नवनीत राणांचा सरकारला इशारा

शहर : अमरावती

शेतकऱ्यांना पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करण्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. मात्र ही मदत शेतकऱ्यांसाठी तोकडी असून काही शेतकऱ्यांच्या शेतात अद्याप पंचनामे झाले नसल्याचं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर टीका करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची घोषणा देखील केली होती.  राणा म्हणाल्या की,'अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक – सोयाबीनचे पूर्ण हातातून गेले. यानंतर कपाशीवर मोठ्याप्रमाणात बोंड अळी व लाल्या आला आहे. कपाशीचे पीकसुद्धा वाया गेले आहे. यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी ५० हजार रुपये जमा करावी. अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही.

राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमवीर काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या प्रमुख नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचे दौरे केले होते. यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १० हजार कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आली आहे. फळबागांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली होती.

 

मागे

मेट्रो कारशेडवरुन केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने; कांजूरमार्गची जागा आमची, केंद्राचा दावा
मेट्रो कारशेडवरुन केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने; कांजूरमार्गची जागा आमची, केंद्राचा दावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड का....

अधिक वाचा

पुढे  

हिंमत असेल तर फिल्मसिटी यूपीला नेऊनच दाखवा; उद्धव ठाकरेंचे जाहीर आव्हान
हिंमत असेल तर फिल्मसिटी यूपीला नेऊनच दाखवा; उद्धव ठाकरेंचे जाहीर आव्हान

हिंमत असेल फिल्मसिटी यूपीला नेऊनच दाखवावी, असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री उद....

Read more