ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेनेने प्लान बदलला ?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 31, 2019 10:46 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेनेने प्लान बदलला ?

शहर : मुंबई

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तासंघर्ष सुरु झाला आहे. सुरुवातीला आक्रमक असलेल्या शिवसेनेचा सूर नरमलाय का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 'तुझं ते माझं, आणि तुझ्या बापाचंही तेही माझं, जास्त ताणू नका, तुटेल' असं म्हणणारे संजय राऊत हे आता एकत्र येण्यातच दोघांचं हित आहे, असं वक्तव्य करत आहेत.

सध्या भाजपा-शिवसेनेतलं बार्गेनिंग फिफ्टी फिफ्टीच्या मुद्द्यावर अडलंय. पण सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेनं नमतं घ्यावं असा सूर शिवसेनेतच वाढू लागलाय. सध्या शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब आणि ज्येष्ठ नेते दिवाकर रावते फिफ्टी फिफ्टीच्या फॉर्म्युलावर ठाम आहेत. तर शिवसेनेनं नरमाईची भूमिका घ्यावी असा खासदार अनिल देसाई, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि विनायक राऊतांचा आग्रह आहे. तर जे योग्य ते करावं, असं माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, आनंदराव अडसूळ आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचं म्हणणं आहे.

निकाल लागून आठवडा होत आला तरी भाजपा आणि शिवसेनेकडून एकमेकांना कुठलाही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही... त्यातच शिवसेनेकडून रोज आक्रमक वक्तव्यं केली जातायत. पण त्याचवेळी शिवसेना सत्ता निसटणार नाही, याचीही खबरदारी घेते आहे.

सत्तासंघर्षाच्या घडामोडी लक्षात घेता आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा रद्द करण्यात आलाय. येत्या काही दिवसांत अमित शाह आणि उद्धव ठाकरेंचा संवाद होऊ शकतो. सुभाष देसाई आणि दिवाकर रावतेंना भाजपाच्या नेत्यांशी बोलणी करण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. बार्गेंनिंगसाठी एखाद्या आमदाराला फोन आलाच, तर तो रेकॉर्ड करण्याचे आदेश देण्यात आलेत.

सरकारस्थापनेबद्दल उद्धवच काय तो निर्णय घेतील, असंच सांगा, असे आदेश प्रवक्त्यांना, नेत्यांना देण्यात आलेत, अर्थात संजय राऊत याला अपवाद आहेत. जोगेश्वरीचा मातोश्री क्लब आमदारांसाठी गरज लागल्यास सज्ज करण्याचे आदेश दिलेत. गेल्यावेळीही एका रात्रीत शिवसेना विरोधी बाकं सोडून सरकारमध्ये सहभागी झाली होती. सत्तेचा मोह सोडता येत नाही, हेही खरंच.

मागे

शिवसेना नरमली ही केवळ अफवा- संजय राऊत
शिवसेना नरमली ही केवळ अफवा- संजय राऊत

सत्तावाटपाच्या चर्चेत शिवसेना नरमली किंवा माघार घेतली, ही केवळ अफवा असल्या....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्रातले सर्वात गरीब आमदार
महाराष्ट्रातले सर्वात गरीब आमदार

महाराष्ट्रातल्या सर्वात गरीब आमदार म्हणून काही दिवसांपासून यांची चर्चा आ....

Read more