ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांचे एकाच वेळी होणार भाषण

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 09, 2019 06:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांचे एकाच वेळी होणार भाषण

शहर : विदेश

संयुक्त राष्ट्र संघाची महासभा न्यूयॉर्कमध्ये 24 ते 30 सप्टेंबर या काळात 74 वी महासभा होत आहे. यामध्ये 112 देशांचे प्रमुख, 48 सरकरांचे प्रमुख आणि 30 हून अधिक परराष्ट्र मंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी जागतिक स्तरावरील उद्देश साध्य करण्यासाठी भारतात केलेल्या प्रभावशाली कामासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 24 सप्टेंबरला या महासभेत बिल गेट्स अँड मेलिंडा फाऊंडेशनच्या 'ग्लोबल गोलकीपर अवॉर्ड-2019' या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर 27 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींचे भाषण झाल्यानंतर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचेही भाषण होणार आहे. गेल्या वर्षभरातील घडामोडींवरून विशेषता भारताने जम्मू कश्मीरमधील कलम 370 हटविल्यापासून पाकिस्तान अस्वस्थ आहे. या पार्श्वभूमीवर प्रथमच  जागतिक स्तरावर या दोन नेत्यांचे एकत्रित भाषण होणार असल्यामुळे ते काय भूमिका मांडणार याकडे सार्‍या जगाचे लक्ष असेल.

न्यूयॉर्क दौर्‍यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात होणार्‍या 'ईकोनोमिकल अँड सोशल कौन्सिल चेंबरच्या 'लीडरशिप मॅटर : रिलेवन्स गांधी इन कॉटेम्पररी वर्ल्ड' या विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 25 सप्टेंबर ला 'ब्लुमबर्ग ग्लोबल बिझनेस समिट' मध्येही मोदींचे भाषण होणार आहे. त्यानंतर प्रश्नोत्तराचे सत्रही असणार आहे. दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधींना  समर्पित केलेल्या 'गांधी पीस गार्डन'चाही शुभारंभ नरेंद्र मोदी करणार आहेत. या गार्डन मध्ये लोक आपल्या प्रियजनांच्या आठवणींमध्ये एक रोप लावतात, अशी एक योजना आहे.

 

मागे

धनंजय  मुंडेंच्या  ताफ्यातील गाडीला अपघात
धनंजय  मुंडेंच्या  ताफ्यातील गाडीला अपघात

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीला आज सकाळी लोणावळ्याज....

अधिक वाचा

पुढे  

पाकने भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी मसुदला गुपचुप सोडले
पाकने भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी मसुदला गुपचुप सोडले

जम्मू कश्मीर मधून 370 कलम भारताने हटविल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. या मुद....

Read more