ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

नाशिक पालिका पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 10, 2020 04:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नाशिक पालिका पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव

शहर : नाशिक

      नाशिक - नाशिक महापालिकेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपला धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार दोन्ही ठिकाणी विजयी झाले आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतराचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जाणवू लागला आहे.


        नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड विभागातील प्रभाग क्रमांक २२ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगदीश पवार यांनी विजय मिळवला. पवार यांनी ४९१३ मते मिळाली तर, भाजपच्या पराभूत उमेदवार विशाखा शिरसाठ यांना १५२५ मते मिळाली. सिडकोतील प्रभाग क्रमांक २८ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेचे मधुकर जाधव २८१२ मतांनी विजयी झाले. जाधव यांना ५८६५ मते मिळाली. तर, मनसेचे दिलीप दातीर यांना ३०५३ मते मिळाली.


         भाजपाच्या सरोज आहिरे यांनी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविण्यासाठी भाजपा नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. तर शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या दिलीप दातीर यांनी मनसेकडून निवडणूक लढविण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.


        दरम्यान, काही दिवसांपूर्वीच लागलेल्या जिल्हा परिषद निवडणूक निकालांत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच पराभव पाहावा लागला. सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. यात धुळे वगळता अन्य पाच जिल्हा परिषदांत भाजपचा दारूण पराभव झाला आहे.
 

मागे

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे भगवान घडावर नतमस्तक
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे भगवान घडावर नतमस्तक

      बीड - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे पदभार स्वीकारल्यानंतर आज ....

अधिक वाचा

पुढे  

"महाशिवआघाडीतून ‘शिव’ काढलं ना, मग आता त्याप्रमाणेच वागा" - उदयनराजे भोसले 

       पुणे -  'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ....

Read more