ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

राष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांच्या नेतृत्वात राज्यपालांची भेट घेणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 31, 2019 11:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांच्या नेतृत्वात राज्यपालांची भेट घेणार

शहर : मुंबई

विधानसभा निवडणूक निकालानंतर नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली. त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक होत राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार आहे.

परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबद्दल मदत देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ दुपारी साडेबारा वाजता राज्यपालांना भेटणार आहे. राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेतली जाणार आहे.

दरम्यान, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. शेतातील काढणीला आलेले सोयाबीन, कापूस, बाजरी मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. त्यामुळे सोयाबीन जाग्यावर उगवून आली तर मक्याच्या कणसाला पालवी फुटली आहे. कापसाच्या पूर्णपणे 'वाती' झाल्या आहेत.

एकीकडे दिवाळी साजरी केली जात असताना या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नाची 'होळी' केली आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने तात्काळ मदत दिली तर शेतकऱ्यांला आधार मिळू शकतो.मागील आठ दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने दाणादाण उडाली आहे.

मागे

महाराष्ट्रातले सर्वात गरीब आमदार
महाराष्ट्रातले सर्वात गरीब आमदार

महाराष्ट्रातल्या सर्वात गरीब आमदार म्हणून काही दिवसांपासून यांची चर्चा आ....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड
शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड

शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी गुरुवारी पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे ....

Read more