ठळक बातम्या Corona Vaccine | मुंबईकरांनी अनुभवली कोरोनावरील पहिली लस.    |     पंख नाहीत मला पण…...    |     कोरड्या खोकल्यामुळे होणारा धोका कसा टाळता येईल?.    |     प्लेट्लेट्स वाढवण्यासाठी हे उपाय करून बघा.    |     सर्दी- पडसं, आणि फ्लू पासून आराम देणारा आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा.    |    

देशाला ट्रॅकवर आणण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचं : सुप्रिया सुळे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2020 07:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

देशाला ट्रॅकवर आणण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचं : सुप्रिया सुळे

शहर : मुंबई

जगात कोरोनामुळे भीतीचं वातावरण आहे. कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र घाबरुन जाता खबरदारी घेणे गरजेचं आहे. घाबरुन प्रश्न सुटणार नाहीत. आपलं आयुष्य जमेल तेवढं ट्रॅकवर आणणे गरजेचं आहे. लोकांच्या मनातून भीती काढले गरजेचं आहे. शिक्षण आणि बरोजगारी कशी पूर्ववत करता येईल यासाठी काम करणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या "प्रश्न महाराष्ट्राचे... उत्तरं नेत्यांची" या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कोरोना संकटातून देशाला ट्रॅकवर आणण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले पाहिजेत. आता कुठल्याही निवडणुका नाहीत, त्यामुळे मतभेद दूर ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचं आहे. बेरोजगारी वाढली त्याचा मोठा परिणाम समाजावर होतो. त्यामुळे देशाला ट्रॅकवर आणणे यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

कोरोना संकंटात मनरेगाच्या निधीतून शेतकऱ्यांना उभं करण्य़ासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मनरेगातून शेळीपालन, कुक्कुटपालन, गोठा यासाठी आम्ही पुणे जिह्यात निधी उपलब्ध करुन देत आहोत. हाच कार्यक्रम येत्या काळात राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात राज्यात राबवणार आहोत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

मागे

महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही थांबवा; नवनीत राणांची राजनाथ सिंहांना विनंती
महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही थांबवा; नवनीत राणांची राजनाथ सिंहांना विनंती

 शिवसैनिकांकडून माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना करण्यात आलेल्या मारहा....

अधिक वाचा

पुढे  

आम्हाला बाळासाहेबांची शिकवण, आमच्या दैवताविरोधात ऐकून घेणार नाही : अनिल परब
आम्हाला बाळासाहेबांची शिकवण, आमच्या दैवताविरोधात ऐकून घेणार नाही : अनिल परब

आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे, कोणीही आमच्या दैवताबद्दल काहीही बोललं तर ....

Read more