ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लोकसभेत समर्थन, राज्यसभेत विरोध; शिवसेनेच्या 'गोंधळा'वर निलेश राणेंचा निशाणा

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 22, 2020 05:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लोकसभेत समर्थन, राज्यसभेत विरोध; शिवसेनेच्या 'गोंधळा'वर निलेश राणेंचा निशाणा

शहर : मुंबई

कृषी विधेयकावर शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभेतल्या दुटप्पी भूमिकेवर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्यावर निलेश राणेंनी हल्लाबोल केला आहे. “आधी नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि यानंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत  समर्थन राज्यसभेत विरोध याचं कारण काय, असा सवाल त्यांनी विचारला आहे. पहिल्यांदा CAA बिलाला आणि त्यानंतर कृषी बिलाला, दोन्ही वेळेला शिवसेनेने लोकसभेत समर्थन दिलं. मात्र राज्यसभेत या दोन्ही बिलाला विरोध केला याचं नेमकं कारण कायसंजय राऊत यांना शिवसेनेचे लोकसभेचे खासदार किंमत देत नाही तसंच नेता मानत नाही, अशा शब्दात निलेश राणे यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. ट्विट करत त्यांनी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर तसंच राऊतांवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी ट्विटमध्ये संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत, “आधी CAA नंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत समर्थन राज्यसभेत विरोध याचं कारण काय?, शिवसेनेचे  लोकसभेचे खासदार संजय राऊत यांना किंमत देत नाही नेता मानत नाही. संजय राऊत 99 टक्के शिवसैनिकांना खटकतात म्हणून संधी मिळेल तेव्हा ते संजय राऊतांना  बाजूला करतात आणि पक्ष भूमिका राहते बाजूला, असं निलेश राणे म्हणाले आहेत.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी देखील शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली होती. शिवसेना हा एक कन्फ्यूज पक्ष आहे. त्यांना दुटप्पी भूमिका  घ्यायची सवय झालेली आहे, अशी टीका फडणीसांनी सोमवारी नागपुरात बोलताना केली होती. तर भाजपशी लढणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी विधेयकाला पाठिंबा का दिला?,  असा सवाल वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विचारला.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

शिवसेना हा एक कन्फ्यूज झालेला पक्ष आहे. त्यांच्या भूमिकांबद्दल आता आश्यर्च वाटत नाही. त्यांना दुटप्पी भूमिका घ्यायची सवय आहे. आमच्यासोबत असताना त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका बजावल्या. एकतर शिवसेनेने कधीच शेतीसंदर्भात भूमिका मांडली नाही. आतातरी शिवसेनेने राजकारण करता शेतकऱ्यांबद्दल भूमिका घ्यावी

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी विधेयकाला पाठिंबा का दिला?- प्रकाश आंबेडकरशेतकऱ्यांचे सुगीचे दिवस आता संपले असून आता त्यांना हमीभाव मिळणार नाही, अशावेळी शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने कृषी विधेयकाला पाठिंबा का दिला, याचा त्यांनी जाहीर खुलासा करावा, असं आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिलं होतं.

मागे

कोरोनाशी लढताना व्यूव्हरचनेत बदल करावा - डॉ. अमोल कोल्हे
कोरोनाशी लढताना व्यूव्हरचनेत बदल करावा - डॉ. अमोल कोल्हे

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंता करणार आहे. कोरोनाशी लढताना आपल्याला व्यू....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करा; भाजप खासदार मनोज कोटक यांची मागणी
मुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करा; भाजप खासदार मनोज कोटक यांची मागणी

मुंबईतील लोकल सुरू करण्यासाठी मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन केलेलं असताना....

Read more