ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

काळजी करु नका, मी कांदा-लसूण फार खात नाही - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 05, 2019 11:24 AM 2019-02-12T14:15:30+5:30

काळजी करु नका, मी कांदा-लसूण फार खात नाही - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन

शहर : देश

कांद्याचे गगनाला भिडलेले भाव सध्या सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहेत. गल्ली ते दिल्ली सर्वत्र कांद्याच्या वाढत्या किमतीचीच चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या खासदार c कांद्याचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर उत्तर देता-देता एका खासदाराने विचारलेल्या प्रश्नावरकाळजी करु नका, मी कांदा-लसूण फार नाही खात असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या.

दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनातले प्रश्न मोदी सरकारला विचारत आहेत. अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा सुरु असताना सुप्रिया सुळेंनी मुद्रा योजना आणि कांद्याच्या वाढत्या किमती यांचा मुद्दा उपस्थित केला.

इजिप्तवरुन कांद्याची आयात करण्याचे कष्ट घेणं प्रशंसनीय आहे. मी कांद्याचा सर्वात मोठा संग्राहक असलेल्या महाराष्ट्रातील आहे. माझा पहिला प्रश्न आहे, की कांद्याचं उत्पादन कमी का झालं? दुसरं म्हणजे, नाशिकमधील खासदार भारती पवार माझ्याशी सहमत असतील, मी कोणताही राजकीय मुद्दा उपस्थित करत नाहीये. पण किमान हमीभाव इतका का घसरला? मला भारतीय असल्याचा अभिमान आहे, कारण प्रत्येक भारतीयाची भूक भागवली जाते. पण कांद्याचं उत्पादन का घटलं? मला इजिप्शियन कांदा खाण्यात अजिबात रस नाही. भारतीयांनी असं का करावं? आपण तांदूळ, दूध यासारख्या अनेक गोष्टींची निर्यात करतो. आपण गहू-तांदळाचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादक आहोत. कांदा उत्पादक हा लहान शेतकरी असतो, त्याच्याकडे पाणी कमी असतं, त्यामुळे त्याला दिलासा द्यायला हवा असं सुप्रिया सुळे बोलत होत्या.

सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मंत्री निर्मला सीतारमन उठल्या, तेव्हा एका खासदारानेतुम्ही कांदा खाता का?’ असा प्रश्न विचारला. त्यावरमी इतका लसूण, कांदा खात नाही हो, काळजी करु नका, मी अशा कुटुंबातील आहे, जिथे कांदा लसूण यांना फारसं महत्त्व नाही असं सीतारमन म्हणाल्या.

कांद्याच्या वाढत्या किंमतींवरुन बुधवारी लोकसभेत गदारोळ झाला. ‘बाजारात आग लागली आहे सर, सर्व वस्तूंचे भाव वाढत आहेत. भारत सरकार जो कांदा आयात करतो, तो बाजारपेठेत 140 रुपये किलो दराने विकला जात आहे असं काँग्रेस खासदार अधीर रंजन म्हणाले. त्यानंतरआपले पंतप्रधान म्हणतात, ना खाणार, ना खाऊ देणार असा टोलाही रंजन यांनी लगावला.

मागे

कर्नाटकात आज भाजपाची कसोटी, १५ जागांवर मतदान सुरू
कर्नाटकात आज भाजपाची कसोटी, १५ जागांवर मतदान सुरू

कर्नाटक विधानसभेतल्या १७ रिक्त जागांपैकी १५ ठिकाणी मतदान सुरू झालं. काठावर....

अधिक वाचा

पुढे  

सिंचन गैरव्यवहारप्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट
सिंचन गैरव्यवहारप्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येताच राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना विदर....

Read more