ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नितिन गडकरींनी २२ आमदारांची केली सीबीआकडे तक्रार 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 17, 2020 04:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नितिन गडकरींनी २२ आमदारांची केली सीबीआकडे तक्रार 

शहर : नागपूर

     नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी सीबीआयच्या निदेशकांकडे महाराष्ट्रातील जवळपास २२ आमदार आणि खासदारांची नावे सोपवली आहेत. आपल्याच मतदारसंघात काम करण्याच्या मोबदल्यात ठेकेदारांकडून टक्केवारीची अपेक्षा करणा-या तसेच त्यासाठी ठेकेदारांना त्रास देणा-या आमदार आणि खासदारांविरूद्ध तक्रार असल्याने त्यांच्यावर लवकरच कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.   


     मिळालेल्या माहितीनुसार, गडकरी यांनी सीबीआय निदेशकांना आपल्या कार्यालयात बोलावून सगळ्या प्रकारची माहिती दिली. तसेच औरंगाबाद येथील रस्त्याच्या संदर्भात एका ठेकेदाराशी झालेल्या बोलण्यातून हा विषय गडकरी यांच्यासमोर आला.


         या यादीत विदर्भ, मराठवाडा, पुणे तसेच कोकण विभागातील आमदारांची नावे असल्यांचे सूत्रांकडून समजले आहे. मराठवाड्यातील कार्यक्रमात बोलताना गडकरी बोट दाखवताना ‘हे टक्का मागणारे आमदार विदर्भातले वैगेरे नाहीत, मी मराठवड्यातल्या आमदारांविषयी गोष्ट करतोय’ असे म्हणाले होते  
 

मागे

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ४ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी 
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ४ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी 

     रत्नागिरी - विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस आण....

अधिक वाचा

पुढे  

बेळगावात खासदार संजय राऊत पोलिसांच्या ताब्यात
बेळगावात खासदार संजय राऊत पोलिसांच्या ताब्यात

      बेळगाव - शिवसेनेचे खासदार संजय राउत यांना बेळगाव विमानतळावर पोहोचत....

Read more