ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारताबद्दल पाकिस्तानी लष्कर म्हणते..

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 05, 2019 01:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारताबद्दल पाकिस्तानी लष्कर म्हणते..

शहर : विदेश

"कलम 370 रद्द करून भारताने युद्धाच्या बिया रोवल्या आहेत". असे पाकिस्तानचे लष्कर म्हणत आहे. कलम 370 रद्द केल्यापासुन पाकिस्तान युद्धजन्य बाबतीत बरेच वक्तव्य करत आहे. त्यात ह्या अजून एका विधांनाची भर पडलेली आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असीफ गफूर म्हणाले की, "पाकिस्तानची सशस्त्रे दले प्रदेशात शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण भारताने कुठलेही ऑपरेशन केले तर त्याला ठोस प्रत्युत्तर दिले जाईल" पुढे बोलताना ते असेही म्हणाले की " भारत आमच्यावर हल्ला करुन आम्हाला कमकुवत करायचा विचार करत असेल तर भारताने हे लक्षात घेतले पाहिजे की, युद्ध फक्त शस्त्र आणि आर्थिक ताकतीवर लढले जात नाही तर त्यात देशभक्ती सुद्धा असते"

नुकताच इम्रान खान यांनी पाकिस्तान युद्धाची सुरवात करणार नाही दोन्ही देशांकडे अणव्स्त्र आहेत. त्याचा वापर झाल्यास सर्व जगाला परिणाम होईल असे म्हणून नरमाईची भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर बोलताना गफुर म्हणाले की  " अण्वस्त्राचा पहिला वापर न करण्याबद्दल आम्ही कुठलही धोरण ठरवलेल नाही. आम्ही धाक ठेवण्यासाठी अण्वस्त्राची निर्मिती केली आहे." एकंदरीत पाहता अजूनही पाकिस्तान च्या डोक्यातून युद्धाची हवा कमी होताना दिसत नाही.

कलम 370 बाबत जागतिक स्तरावर घसा कोरडा केल्यावरही कोणतीही मदत इतर देशांकडून त्यांना मिळाली नाही. त्यानंतर पाकिस्तान ने अणव्स्त्र व युद्ध याबाबतीतची भाषा आणि कृती अजूनच जोर केलेली दिसत आहे.

मागे

संजय राऊत म्हणतात ...
संजय राऊत म्हणतात ...

नुकतीच शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात देश....

अधिक वाचा

पुढे  

कोण करेल आमच्या मूलभूत स्वातंत्र्यच रक्षण ?
कोण करेल आमच्या मूलभूत स्वातंत्र्यच रक्षण ?

आयएनएक्स मीडिया केस च्या सुनावणीमध्ये कोर्टाने पी. चिदम्बरम यांचा जामीन अर....

Read more