ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजप आमदार पुत्राचा भर सभेत पाणउतारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2019 02:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजप आमदार पुत्राचा भर सभेत पाणउतारा

शहर : मुंबई

आमदारांच्या कामाचा पंचनामा करताना बऱ्याच वेळा लोक आक्रमक होतात. नेते फक्त निवडणुकीच्या काळातच भेटीला येतात, निवडून आले की फिरकतही नाहीत हा अनुभव बऱ्याच वेळा मतदारांना येतो. असाच अनुभव आष्टी मतदार संघातील भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांच्या मुलाला आला. तुम्ही कधी गावकऱ्यांना योग्य मदत करत नाही त्यामुळे उगाच तुम्ही गावकऱ्यांना काही शिकवू नका असं सांगत लोक आक्रमक झाले आणि आमदार पुत्राला सभेतून काढता पाय घ्यावा लागला. त्याचं घडला असे की मतदारसंघातिल शिरूर कासार तालुक्यातील टेंभुर्णी येथे कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.सभेसाठी आमदाराचे सुपुत्र अजय धोंडे उपस्थिती होते यावेळी सभा सुरु होताच अजय धोंडे यांनी गावातले लोक राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहे आजबे यांना मदत करत असल्याबद्दल नाराजीचा सूर व्यक्त केला. तुम्ही मुंडे साहेबांचं, पंकजाताईंचं काम केलं पाहिजे असा आग्रह केला. आमदार पुत्रांच्या या वक्तव्याने लोक चांगलेच भडकले. एका कार्यकर्त्याने उभे राहून त्यांच्याशी वाद घालायला सुरूवात केली.

गोपीनाथ मुंडे असताना धोंडे हे काँग्रेसमध्ये होतो. तोच धागा पकडत त्या कार्यकर्त्याने त्यांना चांगलंच सुनावलं. तो म्हणाला, बाळासाहे आजबे काका कसेही असो पण त्यांनी मुंडे साहेब यांना कधी विरोध केला नाही की त्रास दिला नाही. उलट तुम्हीच त्यांना त्रास दिला. आजबे आम्हाला मदत करतात. मात्र तुम्ही हात आखडता घेता.

गावात धार्मिक सप्ताह असो की कुठला कार्यक्रम तुम्ही पैसे थोडे देता आणि जास्त चकरा मारायला सांगता. कार्यकर्त्यांच्या या बोलण्यावर अजय धोंडे समर्थक त्या प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला  धक्के देत बाहेर काढण्यासाठी पुढे आले. मात्र त्यानंतर गावकरी अधिकच आक्रमक झाले. लोकांना बोलू द्या, त्याचा अधिकार आहे असं म्हणतं सभेत गोंधळ सुरू झाला. परिस्थिती अनुकूल नाही असं दिसल्याने आमदार पुत्रांने सभेतून काढता पाय घेतला.

मागे

अजून मतदानच नाही, मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलीत या  मंत्र्यांची नावं!
अजून मतदानच नाही, मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलीत या मंत्र्यांची नावं!

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलाय. प्रचाराची रणधुमाळ....

अधिक वाचा

पुढे  

कणकवलीत उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल
कणकवलीत उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल

विधानसभा निवडणूक २०१९ च्या रणधुमाळीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कण....

Read more