ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निवडणूक काळात एक्झिट पोल, ओपिनियन पोल जाहीर करण्यास भारतीय निवडणूक आयोगाची मनाई

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 17, 2019 02:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निवडणूक काळात एक्झिट पोल, ओपिनियन पोल जाहीर करण्यास भारतीय निवडणूक आयोगाची मनाई

शहर : मुंबई

भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास ही मनाई असणार आहे. तसेच मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे जनमत चाचण्यांचे अंदाज (ओपिनियन पोल) जाहीर करण्यासही बंदी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात २१ ऑक्टोबर २०१९ रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीचे मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर २१ ऑक्टोबर रोजी सकाळी वाजता ते सायंकाळी .३० वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या मतदानोत्तर अंदाज चाचण्यांचे सर्वेक्षण  आयोजित करण्यास किंवा वृत्तपत्रे इलेक्ट्रॉनिक माध्यमे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे त्यातील अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.दरम्यान, मतदान संपण्याच्या वेळेआधी ४८ तास कोणत्याही जनमत चाचणीचे अंदाज (ओपिनियन पोल) किंवा अन्य कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाचे अंदाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्ध करता येणार नाहीत, असेही भारत निवडणूक आयोगामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

 

मागे

'खाऊ त्यांची थाळी, देऊ त्यांना टाळी'- रामदास आठवले
'खाऊ त्यांची थाळी, देऊ त्यांना टाळी'- रामदास आठवले

शरद पवार साहेब कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असले तरी ते कुस्ती खेळू शकत नाही....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई शहर जिल्हा  मतदान जनजागृतीसाठी नाशिकरांच्या  मदतीने सायकल रॅली
मुंबई शहर जिल्हा मतदान जनजागृतीसाठी नाशिकरांच्या मदतीने सायकल रॅली

मुंबई, दि.16 – मुंबई शहर जिल्हयात मतदान जनजागृतीसाठी नाशिकरांच्या मदतीने स....

Read more