ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

पंतप्रधान मोदींची राज्यातली पहिली सभा आज वर्ध्यात

By GARJA ADMIN | प्रकाशित: एप्रिल 01, 2019 11:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पंतप्रधान मोदींची राज्यातली पहिली सभा आज वर्ध्यात

शहर : वर्धा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वर्ध्यामध्ये सभा होत आहे. स्वावलंबी शाळेच्या मैदानावर पंतप्रधानांची ही जाहीर सभा होत आहे. पंतप्रधान नरेंद्रे मोदी यांची राज्यातील ही पहिलीच प्रचार सभा असेल. वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलय. या सभेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या सभेसाठी १८ एकर मैदानात ५० हजार खुर्चा लावण्यात आल्या आहे. या सभेला १ लाखांहून अधिक नागरिक हजेरी लावतील असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात येत आहे.या सभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मराठीतून ट्विट केलंय. केंद्र आणि राज्य सरकारनं केलेल्या लोकाभिमुख कामांच्या जोरावर महाराष्ट्रात महायुतीला जनतेचा भक्कम आशीर्वाद मिळेल असा विश्वास मोदींनी ट्विटद्वारे व्यक्त केलाय. 

'महाराष्ट्रातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींना नमस्कार! आज मी महाराष्ट्राला भेट देणार आहे. महात्मा गांधीजी यांच्या जीवनदर्शनाची साक्ष देणाऱ्या वर्ध्यात संवाद साधणार आहे.केंद्र आणि राज्य सरकारने जी लोकाभिमुख कामे केली, त्यातून महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना-रिपाई(आ) महायुतीला भक्कम आशीर्वाद देतील, हा मला विश्वास आहे!' असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. या सभेसाठी नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी, चंद्रपूरचे हंसराज अहिर, रामटेकचे कृपाल तुमाणे, वर्ध्याचे रामदास तडस, गडचिरोलीचे अशोक नेते, यवतमाळ-वाशिमच्या भावना गवळी, अमरावतीचे आनंद अडसूळ, अकोल्याचे संजय धोत्रे, भंडारा-गोंदियाचे सुनील मेंढे, बुलढाण्याचे प्रताप जाधव हे विदर्भातील युतीचे दहा उमेदवार सभेला उपस्थित असणार आहेत. या सभेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्ध्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेदेखील उपस्थिती लावणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीतही मोदींनी प्रचाराचा नारळ वर्ध्यामध्येच फो़डला होता. ३ एप्रिलला पंतप्रधान गोंदियात सभा घेणार आहेत. विदर्भातल्या ७ जागांवर येत्या ११ एप्रिलला मतदान होत आहे.

 

मागे

एकाच वेळी  “चौकीदार” ५००  ठिकाणांवर पोहोचणार
एकाच वेळी “चौकीदार” ५०० ठिकाणांवर पोहोचणार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'मैं भी चौकीदार' या मोहिमेअंतर....

अधिक वाचा

पुढे  

नरेंद्र मोदींची राज्यातील पहिल्याच सभेत शरद पवारांवर टीका
नरेंद्र मोदींची राज्यातील पहिल्याच सभेत शरद पवारांवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्य....

Read more