ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तुझ्या बापाला जेलमध्ये टाकेल महिला आमदाराला धमकी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 10, 2019 04:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तुझ्या बापाला जेलमध्ये टाकेल महिला आमदाराला धमकी

शहर : सोलापूर

सोलापूर शहर मध्यम मतदारसंघामधून. राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. तर प्रचारादरम्यान एका उमेदवाराने प्रणिती यांना ‘तुझ्या बापाला तुरुंगात टाकल्याशीवाय स्वस्थ बसणार नाही अशी धकमीच दिली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सोलापूर शहर मध्यम मतदारसंघामधून प्रणिती यांच्याविरोधात ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम निवडणुकीच्या मैदानात उभे असून, आडम हे मास्तर म्हणून ओळखले जातात.

नरसय्या यांचा एका सभेदरम्यान तोल सुटला आणि त्यांनी प्रणिती यांना थेट धमकीच देवून टाकली आहे. की ‘तुझ्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय आडम मास्तर शांत बसणार नाही. जो पंतप्रधानाला सोलापूरामध्ये आणण्याची ताकद ठेवतो तो कोणालाही तुरुंगामध्ये घालू शकतो,’ असं आडम मास्तर आपल्या भाषणात म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी माझ्यावर १७० प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल असून हा आकडा २०० झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असंही सांगितले आहे. ‘हे गुन्हे म्हणजे माझ्यासाठी अलंकार आहेत,’ असे वक्तव्यही आडम यांनी केले. आडम यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागे

निवडणूक नाही सोप्पी कोठे नातेवाईक विरोधात तर कोठे भाऊ बहिण विरोधात
निवडणूक नाही सोप्पी कोठे नातेवाईक विरोधात तर कोठे भाऊ बहिण विरोधात

विधासभा निवडणूक ही अनेक कारणांनी गाजते आहे. यामध्ये तर आता राज्यातील अश्या ....

अधिक वाचा

पुढे  

लोकांना मुर्ख बनवू नका, राज ठाकरेंचा हल्लाबोल
लोकांना मुर्ख बनवू नका, राज ठाकरेंचा हल्लाबोल

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत गुरुवारी दोन सभा घेऊन सरकारवर हल्लाब....

Read more