ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

ज्याने गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची चर्चा, पण … : राजू शेट्टी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 29, 2020 10:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30

ज्याने गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची चर्चा, पण … : राजू शेट्टी

शहर : नाशिक

एक अभिनेता ज्याने गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची चर्चा, पण दुधाला भाव मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या रेवनाथ काळेच्या आत्महत्येबद्दल चर्चा नाही, हे दुर्दैवी आहे, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. गेले काहीदिवसांपासून दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर शेतकरी संघटनेकडून आंदोलन सुरु आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झालेली नाही.

आमच्यासाठी गुन्हे नवीन नाहीत. आणखी एका गुन्ह्याची भर, दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढला आहे. मोर्चात गायीचा छळ केल्याचा आरोप हास्यास्पद आहे. कितीही गुन्हे दाखल करा आंदोलन करणार, असंही राजू शेट्टी यांनी सांगितले.

“सरकारने 6 एप्रिल पूर्वी दूध संघाचं संकलन आणि नंतरचे संकलन याचे ऑडिट करावं. उत्पादकांच्या नावावर सरकारचा दूध केंद्रांवर डल्ला”, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला.

देवाची पूजा करणारा शेतकरी आज संकटात सापडला आहे. देऊळ, मंदिर, मस्जिद उघडण महत्वाचा नाही, असंही राजू शेट्टी म्हणाले.

नुकतेच राजू शेट्टींसह 40 आंदोलकांवर बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुधाच्या भुकटीच्या आयात बंदी आणि दूध दर वाढ दिली जात नसल्याच्या निषेधार्थ राज्य सरकार विरोधात मोर्चा काढला होता. परंतु, मोर्चाला परवानगी नसताना देखील कोरोना काळातील नियमांचं उल्लंघन करत गर्दी जमवल्याच्या आरोपावरुन बारामतीत राजू शेट्टींवर गुन्हा दाखल झाला आहे.

मागे

उद्धव ठाकरे यांनी आता बिगर भाजपशासित राज्याचं नेतृत्व करावं : संजय राऊत
उद्धव ठाकरे यांनी आता बिगर भाजपशासित राज्याचं नेतृत्व करावं : संजय राऊत

शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी नाराजीतून मुख्यमंत्री उद्धव ठाक....

अधिक वाचा

पुढे  

'रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही, अभ्यास करुन बोलावं', फडणवीसांचा सल्ला
'रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही, अभ्यास करुन बोलावं', फडणवीसांचा सल्ला

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एलबीटीवरुन भाजपवर केलेल्या टीकेवर व....

Read more