ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये, आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच मरणार : संजय राऊत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 29, 2020 12:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये, आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच मरणार : संजय राऊत

शहर : मुंबई

ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असतं, ते घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात, मात्र आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठणकावून सांगितलं. मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असा इशाराही राऊतांनी दिला. पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडी नोटिशीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Sanjay Raut on ED notice to wife Varsha Raut)

ईडी ही सरकारी संस्था आहे. सरकारी कागदपत्रांकडे कानाडोळा करु शकत नाही, भले कायद्यावर कोणाचाही दबाव असला, तरी आम्ही कायदे मानतो. कायद्यांचं पालन करतो. मी अद्याप ईडीची नोटीस पाहिली नाही, त्याची मला गरजही वाटत नाही, पण तिचं उत्तर देणार आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

हे राजकारण कसं सुरु आहे, ते मला माहिती आहे, ते चालू द्या, मला त्यात पडायचं नाही, असं राऊतांनी स्पष्ट केलं. भाजपच्या त्या तीन नेत्यांबद्दल विचारलं असता हळूहळू त्यांची माहिती देणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.

मला धमकी देणारा जन्माला यायचाय

आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही, लपवाछपवी करणारे पळून जातात, आम्ही मध्यमवर्गीय कुटुंब सरळमार्गाने सरकारी यंत्रणांना सामोरे जातो. सरकार पाडण्याची धमकी दिली जात आहे, मात्र मला धमकी देणारा अजून जन्माला यायचा आहे, जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असं राऊतांनी निक्षून सांगितलं.

विरोधकांचा मानसिक छळ हे राष्ट्रीय कर्तव्य

सध्या ईडीसारख्या सरकारी संस्थांना काही काम राहिलेलं नाही. भाजपच्या विरोधकांचा मानसिक छळ करणे हे त्यांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यांनाही काही काम हवं, त्यांना सरकारचे आदेश पाळण्याचं काम करावं लागत आहे. ईडीची मला कीव येते, कारण अशा सरकारी संस्थांना एके काळी प्रतिष्ठा होती, तरीही सत्यमेव जयतेचा शिक्का असलेल्या सरकारी कागदपत्रांचा मी आदर करत राहीन, असं संजय राऊत यांनी सांगितलं. (Sanjay Raut on ED notice to wife Varsha Raut)

शिवसेनेतच राहणार, शिवसेनेतच मरणार

राज्यसभा उमेदवारीच्या वेळी प्रतिज्ञापत्रात मी सगळी माहिती दिली होती, ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असतं, ते घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात, आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार, असं राऊत यांनी ठणकावलं.

पुढे  

काँग्रेसची ‘स्वबळा’ची मोर्चेबांधणी सुरू; मुंबईत 100 दिवस प्रत्येक वॉर्डात जनता दरबार
काँग्रेसची ‘स्वबळा’ची मोर्चेबांधणी सुरू; मुंबईत 100 दिवस प्रत्येक वॉर्डात जनता दरबार

येत्या काळात मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद या महापालिकांच्या ....

Read more