ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था हटविली

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 24, 2020 02:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था हटविली

शहर : delhi

        नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था मोदी सरकारने अचानक हटविली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सुरक्षा व्यवस्था का काढली? याचे कारणही कळविले नाही. 

            दिल्लीतील पवारांच्या ६ जनपथवरील निवासस्थानी दिल्ली पोलीस दलाचे ३ तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३ असे सहा जवान आणि एक पीएसओ सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. २० जानेवारीपासूनच हे कर्मचारी ड्युटीवर येत नसल्याचे निदर्शनास आले. त्यावरून तेथील सुरक्षा व्यवस्था हटविल्याचे समोर आले आहे. मात्र महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानेच पवारांची सुरक्षा हटविण्यात आल्याची चर्चा त्यामुळे राजकीय वर्तुळात रंगली आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीत सुरू असलेले आंदोलन आणि होणार्‍या विधानसभा निवडणुकीमुळे पवारांसह ४० जणांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.     
 

पुढे  

'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला समिश्र प्रतिसाद
'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला समिश्र प्रतिसाद

          मुंबई : वंचित  बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर य....

Read more