ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘२४ तास मुंबई’ला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 22, 2020 03:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 ‘२४ तास मुंबई’ला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

शहर : मुंबई

         मुंबई - अखेर मुंबईत येत्या २६ जानेवारीपासून नाइट लाइफ सुरू होणार आहे. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या योजनेवर आज शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयानुसार देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत हॉटेल्स, रेस्टॉरंट व दुकानं २४ तास सुरू राहणार असून पब आणि बारसाठी वेळेची मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. 


       तसेच गृहमंत्री अनिल देशमुख व आदित्य ठाकरे यांनी स्वत: या निर्णयाची माहिती दिली. नाइट लाइफ सुरू झाली तरी पब आणि बारला पूर्वीप्रमाणे वेळेची मर्यादा राहील. पब आणि बार दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील असंही त्यांनी सांगितलं. 'नाइट लाइफ' सुरू होणार असली तरी दुकानं उघडी ठेवण्याची सक्ती कुणावरही केली जाणार नाही. ती बाब पूर्णपणे ऐच्छिक असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 


        या प्रस्तावानुसार येत्या २६ जानेवारीपासून मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात २४ तास हॉटेल्स, मॉल सुरू राहतील. शिवाय मर्यादित आणि निवासी भाग नसलेल्या परिसरात हॉटेल, मॉल्स आणि थिएटर २४ तास खुले ठेवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला येणार आहे.


      मुंबईच्या उत्पन्न आणि रोजगार निर्मितीसाठी हा निर्णय योग्य आहे. यामुळे टॅक्सी, रेल्वे यांना सुद्धा चालना मिळेल. खासगी सिक्युरिटी असेल तसेच ज्यांना पोलीस सिक्युरिटी हवी असेल त्यांना ती दिली जाईल, त्यामुळे सरकारला सिक्युरिटीचा रिव्हेन्यू मिळेल”, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. 'नाइट लाइफ' हा रोजगाराच्या संधी देण्याचा एक प्रयत्न आहे. मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेबाबत बोलणाऱ्यांनी आधी जेएनयू व दिल्ली सांभाळावी. विद्यापीठं सुरळीत चालवावीत, मग मुंबईबद्दल बाता माराव्यात, असंही त्यांनी सुनावलं.

 

      आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी अनेकवेळा आपली भूमिका जाहीर केली आहे., “मुंबईकरांनी मुंबई २४ तासचं स्वागत केलं आहे. जगभरात पाहिलं तर लंडनची नाईट टाईम इकॉनॉमी ५ बिलियन पाऊंडची आहे. दुकानं, हॉटेल्स आणि थिएअटरसोबत बीएसटीच्या बस ओला, उबर, टॅक्सी, रिक्षा यांच्याही उत्पादनात वाढ होणार आहे. आत्ताही मुंबई २४ तास सुरुच राहते. कितीतरी अशी ठिकाणं आहेत जिथं रात्रभर हॉटेल्स सुरु असतात. या इकॉनॉमिला अधिकृत करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्या उत्पादनासोबत राज्याकडेही कर येईल. यामुळे रोजगारही तिप्पट होऊ शकतो.”

मागे

भाजपची सत्ता असलेल्या नागपूर पालिकेत तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी बदली
भाजपची सत्ता असलेल्या नागपूर पालिकेत तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी बदली

          नागपूर : नागपूर महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. तथाप....

अधिक वाचा

पुढे  

शिवभोजन थाळीसाठी 'आधार'ची गरज नाही - छगन भुजबळ 
शिवभोजन थाळीसाठी 'आधार'ची गरज नाही - छगन भुजबळ 

          मुंबई  -  येत्या २६ जानेवारीपासून राज्यात १० रुपयात थाळीच....

Read more