ठळक बातम्या Corona Vaccine | मुंबईकरांनी अनुभवली कोरोनावरील पहिली लस.    |     पंख नाहीत मला पण…...    |     कोरड्या खोकल्यामुळे होणारा धोका कसा टाळता येईल?.    |     प्लेट्लेट्स वाढवण्यासाठी हे उपाय करून बघा.    |     सर्दी- पडसं, आणि फ्लू पासून आराम देणारा आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा.    |    

महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही थांबवा; नवनीत राणांची राजनाथ सिंहांना विनंती

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2020 12:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही थांबवा; नवनीत राणांची राजनाथ सिंहांना विनंती

शहर : देश

 शिवसैनिकांकडून माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना करण्यात आलेल्या मारहाणीचा मुद्दा खासदार नवनीत राणा यांनी चांगलाच लावून धरला आहे. यावरून काल त्यांनी शिवसेनेवर टीकाही केली होती. यानंतर सोमवारी नवनीत राणा यांनी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही थांबवा, अशी विनंतीही त्यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे केली.

यापूर्वी राजनाथ सिंह यांनीदेखील मदन शर्मा यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. यानंतर राजनाथ सिंह यांनी ट्विट करून, माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराच दिला होता.

सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र शेअर केल्यामुळे शुक्रवारी ते १० शिवसेना कार्यकर्त्यांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते. भाजपनेही हा मुद्दा लावून धरला होता. मात्र, यानंतर संजय राऊत यांनी मदन शर्मा यांच्यावरील हल्ला म्हणजे शिवसैनिकांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे नवनीत राणा चांगल्याच संतापल्या होत्या.त्यांनी संजय राऊतांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता. तसेच राऊतांप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही शिवसैनिकांच्या गुंडगिरीला समर्थन आहे का, असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला होता.

मागे

नागपुरात लॉकडाऊन लावा, वडेट्टीवारांची मागणी, पालकमंत्र्यांचा विरोध
नागपुरात लॉकडाऊन लावा, वडेट्टीवारांची मागणी, पालकमंत्र्यांचा विरोध

नागपुरात लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये मतभिन्नता दिसून य....

अधिक वाचा

पुढे  

देशाला ट्रॅकवर आणण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचं : सुप्रिया सुळे
देशाला ट्रॅकवर आणण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचं : सुप्रिया सुळे

जगात कोरोनामुळे भीतीचं वातावरण आहे. कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे, म....

Read more