ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'सुन्नी वक्फ बोर्डाने अयोध्येतील पाच एकर जागा काँग्रेसला दान करावी'

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 10, 2019 10:53 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'सुन्नी वक्फ बोर्डाने अयोध्येतील पाच एकर जागा काँग्रेसला दान करावी'

शहर : मुंबई

अयोध्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर असददुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष कमालीचा नाराज झाला आहे. अयोध्येत मशीद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला देण्यात येणारी पाच एकर  जागा आम्ही काँग्रेसला दान करू. जेणेकरून बाबरी मशीद त्यांच्या काळात उद्ध्वस्त झाली त्याची आठवण म्हणून याठिकाणी काँग्रेस भवन स्थापन करता येईल, असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला. अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते शनिवारी औरंगाबाद येथील पत्रकारपरिषदेत होते.

यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविषयी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करतो. मात्र, ही लढाई न्यायासाठी होती. मशीद बांधण्यासाठी देण्यात आलेल्या पाच एकर जागेची आम्हाला गरज नाही. इतकं सगळं जे चाललं होतं, ते कशासाठी आणि कुणासाठी सुरु होतं, हे अखेर स्पष्ट झाले. या निर्णयामुळे भाजप आणि काँग्रेसवाले सर्वात जास्त खूश झाले असतील. सुन्नी वक्फ बोर्डाने ही पाच एकर जागा स्वीकारू नये. ही जागा आम्ही काँग्रेसला दान करू. याठिकाणी त्यांना काँग्रेस भवन स्थापन करता येईल.  असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.

तसेच इतके वर्षे आम्ही न्यायासाठी लढलो, पाच एकर जागेसाठी नाही. हा देश निधर्मीवादी आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भावनांचा आदर झाला पाहिजे. याबाबत मुस्लिम पर्सनल बोर्ड जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. मात्र, आम्ही आमच्या भावना व्यक्त करणारच, असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले.

मागे

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, मुंबईत झळकले पोस्टर
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, मुंबईत झळकले पोस्टर

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी शिवसैनिकांची इच्छा आहे, असे फलक आता ....

अधिक वाचा

पुढे  

गुगल सर्च'मध्ये शरद पवार नंबर 1
गुगल सर्च'मध्ये शरद पवार नंबर 1

राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून 17 दिवस झाले तरी अद्याप सरकार स्थ....

Read more