ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोल्हापूरकरांचा नाद करायचाच नाही; माजी सरपंचाच्या पत्नीला धूळ चारुन साफसफाई करणाऱ्या आजीबाईंचा विजय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 19, 2021 12:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोल्हापूरकरांचा नाद करायचाच नाही; माजी सरपंचाच्या पत्नीला धूळ चारुन साफसफाई करणाऱ्या आजीबाईंचा विजय

शहर : कोल्हापूर

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या (Gram Panchayat results) सोमवारी जाहीर झालेल्या निकालावेळी अनेक रंजक घडामोडी पाहायला मिळाल्या. आजपर्यंत राज्याला कायम दिशा दाखवणाऱ्या कोल्हापुरातही असाच एक प्रसंग घडला. करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी या गावातील लोकांनी 40 वर्ष सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या आजीला ग्रामपंचायतीवर निवडून आणले आहे.

द्रौपदी सोनूले असे या निवडून आलेल्या आजींचं नाव आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्या गडमुडशिंगी गावच्या सदस्या बनल्यात. ते ही गावाच्या माजी सरपंचांच्या पत्नीला धूळ चारून. गावातील लोकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच द्रौपदी सोनूले ही कामगिरी करु शकल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी हे गाव कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात येते. त्यामुळे सहाजिकच या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस पाहायला मिळते. यावेळच्या निवडणुकीत गावातील पॅनल प्रमुख तानाजी पाटील यांनी द्रौपदी आजींना संधी द्यायचं ठरवलं आणि फक्त ठरवलंच नाही तर त्यांना निवडूनही आणले.

40 वर्ष गावची स्वच्छता करणाऱ्या, गटार साफ करणाऱ्या द्रौपदी आजी आता सन्मानानं सदस्य म्हणून ग्रामपंचायती मध्ये जाणार आहेत. ग्रामपंचायतीमध्ये वीस रुपये महिना पगार असल्यापासून काम करणाऱ्या आजींना आता सदस्य झाल्याचा अतिश्य आनंद झाला आहे. मात्र, यापुढेही आपण गावची सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आजीची माया, देवाघरी जातानाही नातवावर विजयाची छाया

ग्रामीण भागातील लोकजीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचे (Gram Panchyat Election Results) निकाल सोमवारी जाहीर झाले. यामध्ये पुण्याच्या मुळशी येथील एका प्रसंगाची प्रचंड चर्चा रंगली आहे. याठिकाणी एका आजीने आपल्या नातवाच्या विजयासाठी साक्षात मृत्यूलाही अडवून ठेवले होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मुळशी तालुक्यातील वाळेण येथील वॉर्ड १ मध्ये विजय मुगुट साठे यांचा एक मताने विजय झाला. साठे यांच्या 113 वर्षांच्या आजी सरुबाई साठे यांच एक मत त्यांच्या या विजयासाठी निर्णायक ठरलं असं म्हणावं लागेल. मतदानाच्या दिवशी नातवाला मतरुपी आशीर्वाद देत आजींनी शेवटचा श्वास घेतला. त्यामुळे विजय साठे यांना मिळालेले मोलाचे एक अविस्मरणीय असचं आहे. विजयी उमेदवार विजय साठे यांच्या आजी सरुबाई शंकर साठे या ११३ वर्षाच्या होत्या. मतदानाच्या दिवशी आपल्या नातवाला मतदान रुपी आशीर्वाद देऊन रात्री शेवटचा श्वास घेतला. अखेर आजीचे हे मतच त्यांच्या विजयासाठी निर्णायक ठरले. त्यामुळे निकालाच्या दिवशी विजय मुगुट साठे यांच्या एका डोळ्यात आसू तर एका डोळ्यात हसू होते.

मागे

आघाडी जिंकली, पण भाजपच नंबर वन; आता सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी
आघाडी जिंकली, पण भाजपच नंबर वन; आता सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकून एकीचं बळ दाख....

अधिक वाचा

पुढे  

Maratha Reservation | मराठा आरक्षणाची सुनावणी 5 फेब्रुवारीला, EWS ला मराठा संघटनांचा विरोध
Maratha Reservation | मराठा आरक्षणाची सुनावणी 5 फेब्रुवारीला, EWS ला मराठा संघटनांचा विरोध

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी 25 जानेवारी तारीख देण्यात आल....

Read more