ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

10 कलमी वचननामाच पुर्ण करता आला नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा - धनंजय मुंडे

By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 17, 2019 08:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

10 कलमी वचननामाच पुर्ण करता आला नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा - धनंजय मुंडे

शहर : मुंबई

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  राज्यात आणि केंद्रात सत्ता, पाच वर्ष चार महत्वाच्या खात्याचे मंत्री असतानाही परळी विधानसभा मतदार संघातील 30 महत्वाच्या प्रश्‍नांपैकी एकही प्रश्‍न पंकजाताईंना का सोडवता आला नाही असा सवाल परळीकर जनता विचारू लागली आहे. पंकजाताईंनी यापैकी एकही प्रश्‍न सोडवला असेल तरच त्यांना मतदान मागण्याचा अधिकार असल्याचेही परळीची जनता बोलू लागली आहे. परळीकर जनता विचारत असलेले हेच ते खालील 30 सवाल.

1) परळी अंबाजोगाई रस्ता गेल्या दोन वर्षांपासून रखडून ठेवून लाखो नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला. परळी-बीड, परळी-गंगाखेड रस्त्याचे चौपदरीकरण, दुरूस्ती करण्यात का अपयश आले.
2) गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या परळी-मुंबई रेल्वेचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यात का यश मिळाले नाही.
3) श्री वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा केंद्राच्या 12 ज्योतिर्लिंग सूचित समावेश का करता आला नाही.
4) भूमीपूजन होवून तीन वर्षे झालेल्या परळीच्या बायपास रस्त्याचे काम का पूर्ण करू शकले नाहीत.
5) परळी विधानसभा मतदार संघात एकही नवा उद्योग किंवा प्रकल्प सुरू होऊ शकला नाही.
6) राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेच्या माध्यमातून होणार्‍या विकास कामात वेळोवेळी जाणीवपूर्वक खोडा घालण्याचे पाप केले नाही का?
7) दक्षिण मध्य रेल्वेला सर्वाधिक महसूली उत्पन्न देणार्‍या परळी रेल्वे स्थानकाला मआदर्श स्थानकफ बनविण्यात अपयश आले नाही का?
8) पाच वर्षात बसस्थानकात एकही काम नाही, बस थांबणार्‍या मैदानाचे साधे डांबरीकरण ही करता आले नाही, हे खोटे आहे का?
9) औष्णिक विद्युत केंद्रातील अनेक संच बंद केले ते सुरू करण्यासाठी का प्रयत्न केले नाही.
10) मवाणफ प्रकल्पाचा विकास तर नाहीच परंतु साधी दुरुस्ती ही नाही, कालव्याची दुरुस्ती सुध्दा करता आली नाही, हे खरे नाही का?
11) ऊसतोड कामगार महामंडळा बाबत केवळ दिशाभूूलच झाली, हे प्रामाणिकपणे मान्य कराल का?
12) परळी मतदार संघात सिंचनाचा एकही नवीन प्रकल्प किंवा नवीन योजना झाली नाही की, एखादा पाझर तलाव बांधता आला नाही, हे सत्य नाही का?
13) जायकवाडीचे पाणी वाण मध्ये आणता आले नाही, हे मान्य कराल का?
14) लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भूमिपूजन केलेल्या पंचतारांकित एमआयडीसी का सुरू होवू शकली नाही?
15) प्रदूषण मुक्त परळीसाठी कोणती उपाययोजना केली?
16) जलयुक्त शिवार सारख्या चांगल्या योजनेचा बट्ट्याबोळ केला, जलयुक्त शिवार पुन्हा गाळयुक्त झाले नाही का?
17) मवैद्यनाथ बाजारफ बंद करून कामगारांच्या उदरनिर्वाहावर कुर्‍हाड आणली, हे उघड सत्य नाही का?
18) वैद्यनाथ कारखाना ढिसाळ नियोजनामुळे कर्जबाजारी करून ठेवला, शेतकर्‍यांना एफ.आर.पी. नाही की, कर्मचार्‍यांना पगार नाही दिला, ऊस तोडणी कामगारांची परवड नाही केली, हे सत्य नाही का?
19) खासदारांच्या मआदर्श गावफ योजनेत समावेश केलेल्या पोहनेर गावात विकासाचा केवळ फार्स केला, हे सत्य नाही का?
20) परळी तालुक्यातील 21 गावांना पाणी पुरवठा करणारी संगम 18 खेडी पाणी पुरवठा योजना तुम्हाला का सुरू करता आली नाही?
21) तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत समावेश असलेल्या मतदार संघातील अनेक तीर्थक्षेत्राच्या कामांसाठी निधीच उपलब्ध नाही, हे खरे आहे का?
22) परळी ची जनता दुष्काळात पाणी-पाणी करत असताना पाणी टंचाई निवारण्यासाठी काहीच केले नाही, हे उघड सत्य नाही का?
23) परळी नगरपरिषद व परळी मतदार संघातील राजकीय द्वेषापोटी राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतींना शासकीय निधी देण्यात अडथळा आणला, हे सत्य नाही का?
24) रेल्वे उड्डाण पूलाला समांतर उड्डाणपूल का करता आला नाही?
25) परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाला गती देण्यासाठी परळीतून काम करण्याची घोषणा केली, त्याचे उद्घाटन रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते केले, त्याचे काम परळीतून सुरुच झाले नाही, हे खोटे आहे का?
26) खासदार, आमदारांनी परळी शहरात केलेल्या शुद्ध जल योजनेचा बोजवारा उडाला नाही का?
27) काळवटी धरणाची उंची वाढविण्यास परवानगी देऊन परळीला पाणी पुरवठा होणार्‍या वाण प्रकल्पातील जलसाठा रोखण्याचे पाप केले आहे, हे सत्य नाही का?
28) परळी शहर व मतदारसंघात नवीन प्रशासकीय कार्यालये आणता आले नाही पण आहे ती कार्यालये परळीतून स्थलांतरित होताना लोकप्रतिनिधी म्हणून केवळ बघ्याची भूमिका घेतली, हे खरे नाही का?
29) शेता शिवारात राबणार्‍या शेतकरी, शेत मजुरांचा, त्यांच्या जनावरांचा वीज कोसळून होणारा मृत्यू रोखण्यासाठी घोषणा करूनही वीज रोधक यंत्रणा उभारता आली नाही, हे सत्य नाही का?
30) परळीतील हजारो वीज ग्राहकांना अनेक वर्षापासून वीज बिलाचे वाटप, मीटरची रिडींग न घेता बील देऊन वीज ग्राहकांची पिवळणूक का थांवबता आली नाही, त्यावेळी आमदार आणि या भागाचो प्रतिनिधी म्हणून काय केले.

वचननामाच पाळला नाही - धनंजय मुंडे
परळी विधानसभा मतदार संघातील हे 30 प्रश्‍नच नव्हे तर 5 वर्षा पुर्वीच्या निवडणूकीत दिलेल्या वचननाम्यातील मुंडे साहेबांचे स्मारक सोडला एकही प्रश्‍न यांना सोडवण्यात आले नाहीत. त्यांच्या कडून काय अपेक्षा करणार ? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. पंकजाताईंनी नवीन काही करण्यापेक्षा विकास कामात मी मंजूर केलेल्या विकासकामात अडथळा आणला नसता तरी अनेक प्रश्‍न मार्गी लागले असते असे ते म्हणाले.

मागे

गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न 'बेटी पंकजा' पुर्ण करतेयं - पंतप्रधानांचे प्रशस्तीपत्र 
गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न 'बेटी पंकजा' पुर्ण करतेयं - पंतप्रधानांचे प्रशस्तीपत्र 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- माझे मित्र गोपीनाथ मुंडे यांचे विकासाचे स्वप्न "....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्रातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगार
महाराष्ट्रातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगार

भाजपकडून मोठा गाजावाजा करण्यात आलेले विकासाचे डबल इंजिन मॉडेल महाराष्ट्र....

Read more