ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निवडणुकीच्या निकाला आधीच तीन उमेदवारांचा जल्लोष

By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2019 10:00 AM 2019-02-12T14:15:30+5:30

निवडणुकीच्या निकाला आधीच तीन उमेदवारांचा जल्लोष

शहर : मुंबई

यावेळच्या विधानसभा निवडणुकीत अनेक लक्ष्यवेधक व आश्चर्यकारक घटना घडताना दिसत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मतदान पूर्ण होण्यास तासभरच्या अवधी असतानाच प्रसार माध्यमामध्येचं शिवसेना - भाजपा युतीला सत्ता स्थांनावावर बसविण्याची स्पर्धाचं सुरू झाल्याचं पाहाला मिळालं. प्रसार माध्यमांनी याबाबत अंदाज घाईने वर्तवून महायुतीची सत्तास्थानी येणार असल्याचा सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार विजयी झाल्याचा जल्लोष केला.

रत्नागिरीतील दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय कदम यांच्या विरोधात शिवसेनेचे रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांचं तगड आव्हान आहे. तथापि काल मतदान झाल्यावर आपणच विजयी होणार या उत्साहात संजय कदम यांची विजयी मिरवणूकही काढली. तर कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीफ यांची विजयी मिरवणूक काढून जल्लोष केला. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे संजय घाटगे यांचा सामना झाला.

पुण्यातील खडकसा येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अति उत्साही कार्यकर्त्यांनी सचिन दोंडके विजयी झाल्याच्या थाटात खांद्यावर घेऊन विजयी मिरवणूक काढली. फटाक्यांची आतिषबाजी केली. त्याचबरोबर सचिन दोंडके आमदार झाल्याबद्दल त्यांना शूभेछा देणारे बॅनर्सही वारजे भागात लावले आहेत. येत्या 24 ऑक्टोबरला हा आत्मविश्वास होता की अति आत्मविश्वास होता हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

मागे

गोदाकाठच्या लोकांची रस्त्यासाठी अभूतपूर्व ऐकी
गोदाकाठच्या लोकांची रस्त्यासाठी अभूतपूर्व ऐकी

सोनपेठ:-तालुक्यातील गोदाकाठच्या गावांनी रस्त्यासाठी मतदान न करण्याचा निर....

अधिक वाचा

पुढे  

227 मतदार असेलेल्या गावात शून्य मतदानाची नोंद
227 मतदार असेलेल्या गावात शून्य मतदानाची नोंद

केंद्र शासन, राज्य शासन, निवडणूक आयोगासह अनेक प्रतिष्ठितांनी आव्हान करून क....

Read more