ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा निर्णय झालाच नव्हता - देवेंद्र फडणवीस

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 08, 2019 07:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा निर्णय झालाच नव्हता - देवेंद्र फडणवीस

शहर : मुंबई

महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्राच्या जनतेने ५ वर्ष सेवा करण्याची संधी दिली म्हणून मी त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदी यांचे, सर्व अधिकारी, माझे सहकारी तसेच आमच्या सोबत असलेला आमचा मित्रपक्ष आणि त्यांच्या नेत्यांचे मी आभार मानतो. महाराष्ट्राचं सरकार आम्ही पारदर्शीपणे चालवलं. अनेक संकटांचा सामना आम्ही केला. दुष्काळ, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलं.

अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचं काम सरकारने केलं. गेल्या ५ वर्षात विलक्षण असं काम केलं. महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षात मोठं काम झालं. महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेत आम्हाला बहुमत दिलं. राज्यात ही विधानसभेत महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो. लोकांनी महायुतीला बहुमत दिलं. भाजपने सर्वाधिक १०५ जागा जिंकल्या. लढलेल्या जागांपैकी लोकांनी ७० टक्के जागा आम्हाला दिल्याने हा विजय मोठा आहे. कामाची पावती ही लोकांनी दिली.

पुढे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, 'निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, 'सरकार बनवण्याचे आमचे सर्व मार्ग खुले आहेत.' पण लोकांनी महायुतीला मतदान केलं होतं. महायुती म्हणून आमदार निवडून आले होते. त्यांनी असं वक्तव्य का केलं असा प्रश्न आम्हाला पडला. महायुतीचं सरकार बनले असं आम्ही बोललो होते. गेले १५ दिवस ज्या प्रकारे वक्तव्य आपल्याला पाहायला मिळाली. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा माझ्या समोर निर्णय झाला नव्हता. अडीच वर्षाबाबत माझ्या समोर कधीच बोलणी झाली नव्हती.'

'मी अमित शहांना विचारलं, नितीन गडकरींनाही विचारलं पण त्यांनी शब्द दिला नव्हता असंच सांगितलं. या संदर्भात जे समज, गैरसमज झाले असतील ते चर्चेतून सोडवणं शक्य झालं असतं. पण चर्चाच करणार नाही अशी भूमिका होती. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चांगले संबंध होते. मी माननिय उद्धव ठाकरेंना फोन केले पण त्यांनी फोन घेतले नाहीत. चर्चा शिवसेनेने थांबवली आहे. आमच्याकडे चर्चेची दारं उघडी होती. भाजपशी चर्चा न करता राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा करायला शिवसेनेला वेळ होता.' अशी टीका देखील फडणवीस यांनी केली आहे.

मागे

मला खोटं ठरवल्यामुळे चर्चा थांबवली - उद्धव ठाकरे
मला खोटं ठरवल्यामुळे चर्चा थांबवली - उद्धव ठाकरे

राज्यातला सत्तास्थापनेचा पेच आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. देवेंद्र ....

अधिक वाचा

पुढे  

देवेंद्र फडणवीस यांच्यावर 'सामना'तून टीका
देवेंद्र फडणवीस यांच्यावर 'सामना'तून टीका

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दैनिक 'सामना'तून टीका ....

Read more