ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 29, 2019 10:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय

शहर : मुंबई

गुरुवारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत सहा कॅबिनेट मंत्र्यांच्या शपथविधीनंतर पहिली कॅबिनेटची बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. 'हे सर्वसामान्य जनतेचं सरकार असेल... त्यात कुणालाही दहशत वाटेल असं वातावरण राहू देणार नाही... महाराष्ट्र नंबर एकचं राज्य करू' अशी ग्वाही देत आजच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

रायगडाच्या संवर्धनासाठी २० कोटींचा निधी मंजूर

पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जे दोन महत्त्वाचे निर्णय घेतले त्यातील पहिला निर्णय म्हणजे, रायगडाच्या संवर्धनासाठी २० कोटींचा निधी मंजूर करणं... 'छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगडाच्या संवर्धनासाठीचा पहिलाच प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत आला. आत्तापर्यंत या कामासाठी २० कोटींचा खर्च झाला आहे. आज आणखीन २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचं भाग्य मंत्रिमंडळाला मिळालं' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय.

तसंच, 'शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आत्तापर्यंत जाहीर केलेल्या आहेत, सुरु आहेत त्याचे वास्तव मांडण्याच्या सूचना मुख्य सचिव अजोय मेहता यांना केलेल्या आहेत. नुकसानीचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत... शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करणार नाही. आढावा घेऊन शेतकऱ्यांना योग्य ती आणि समाधानकारक मदत करणार' असंही यावेळ उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

मागे

शपथविधी सोहळ्यानंतर ठाकरे सरकारची पहिली कॅबिनेट बैठक, घेणार मोठा निर्णय?
शपथविधी सोहळ्यानंतर ठाकरे सरकारची पहिली कॅबिनेट बैठक, घेणार मोठा निर्णय?

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणा....

अधिक वाचा

पुढे  

देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, ठाकरे सरकारवर 24 तासात दुसर टीकास्त्र
देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, ठाकरे सरकारवर 24 तासात दुसर टीकास्त्र

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत पाहाय....

Read more