ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

विक्रमगडमध्ये व्होटर स्लिपरवर घोळ

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 03:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विक्रमगडमध्ये व्होटर स्लिपरवर घोळ

शहर : पालघर

लोकसभा निवडणूका  सुरू असताना विक्रमगडमध्ये वाटप करण्यात आलेल्या व्होटर स्लिपवर पुरुषांच्या नावासमोर महिलेचा फोटो तर महिलांच्या नावासमोर पुरुषांचा फोटो छापण्यात आल्याचे उघडकीस आले. इतकेच नव्हे तर काही स्लिपवर इमारतींची नावेच छापलेली नाहीत. अनेक स्लिपवर तर सदनिका क्रमांक नसल्याने व्होटर स्लिप वाटणा़र्‍यां बीएलओ कर्मचा़र्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विक्रमगड शहरातील जुनी बाजारपेठ येथील रहिवासी भास्कर बाळकृष्ण मुळे व अतुल विलास वाडेकर यांचे व्होटर स्लिपवर महिलांचा फोटो छापण्यात आला आहे, तर शालिनी बाळकृष्ण मुळे यांच्या व्होटर स्लिपवर पुरुषाचा फोटो देण्यात आला आहे. त्यामुळे यानिमित्ताने निवडणूक अधिका़र्‍यांंचा भोंगळ कारभार उघडकीस आला असून अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागे

समीर भुजबळांच्या आईचे नाव मतदार यादीत नाही; भुजबळ संतप्त
समीर भुजबळांच्या आईचे नाव मतदार यादीत नाही; भुजबळ संतप्त

छगळ भुजबळ यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांच्यासमवेत भुजबळ कुटुं....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी ही केले सहकुटुंब मतदान
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी ही केले सहकुटुंब मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सोमवारी सकाळपासू....

Read more