ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

महाराष्ट्रातले सर्वात गरीब आमदार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 31, 2019 10:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्रातले सर्वात गरीब आमदार

शहर : मुंबई

महाराष्ट्रातल्या सर्वात गरीब आमदार म्हणून काही दिवसांपासून यांची चर्चा आहे. त्यांच्याकडे राहायला स्वतःचं घरही नाही.... त्यांच्याकडची रोख रक्कम किती आहे हे पाहाल, तर तुम्हीही थक्क व्हाल.तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण शेतात राबणारे, गायीगुरांना चरायला नेणारे हे आमदार आहेत. डहाणू मतदारसंघातून विजयी झालेले हे माकपाचे विनोद निकोले..

महाराष्ट्रातले सगळ्यात गरीब आमदार आहेत. त्यांच्याकडे फक्त 51 हजार 82 रुपये एवढीच रोख रक्कम आहे. राहायला स्वतःचं घरही नाही.

विनोद निकोले डहाणू जवळच्या वाकी गावात एका खोलीत भाड्याने राहतात. या अतिशय सामान्य माणसाला मतदारांनी आमदार म्हणून निवडून दिलं आहे.

विनोद निकोलेंचा जन्म शेतमजूर कुटुंबातला. पैसे नसल्यानं शिक्षण अर्धवट सोडलं आणि विनोद माकपाचे कार्यकर्ते म्हणून काम करु लागले. त्यांची पत्नी बबिता आश्रमशाळेत सेविका आहेत. चार ते पाच हजारांत निकोले कुटुंब महिन्याचा खर्च भागवत होतं. 

निवडणूक लढवायची आणि जिंकायची तर बक्कळ पैसा लागतो, या समजाला निकोले यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.

 

मागे

शिवसेनेने प्लान बदलला ?
शिवसेनेने प्लान बदलला ?

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्त....

अधिक वाचा

पुढे  

राष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांच्या नेतृत्वात राज्यपालांची भेट घेणार
राष्ट्रवादी आक्रमक, अजित पवारांच्या नेतृत्वात राज्यपालांची भेट घेणार

विधानसभा निवडणूक निकालानंतर नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गट....

Read more