ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

मतदारांकडूनगुप्त मतदानाचे नियम धाब्यावर, ईव्हीएमचा फोटो काढत केले मतदान !

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 03:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मतदारांकडूनगुप्त मतदानाचे नियम धाब्यावर, ईव्हीएमचा फोटो काढत केले मतदान !

शहर : उस्मानाबाद

लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदान गुरूवारी पाड पडत आहे. सकाळी वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. मतदान हे गुप्त असावे असा नियम असताना अनेक उत्साही मतदारांनी या नियमांना धाब्यावर बसवल्याचे चित्र दिसत आहे. मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्यास, तसेच फोटो, चित्रकरण करण्यास बंदी असताना अनेक उमेदवारांनी त्यांचे ईव्हीएमवर मत देणाचे फोटो काढले असून सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत.हे फोटो व्हॉटस ॅप, फेसबुकवर व्हायरल होत असल्यामुळे गुप्त मतदान करण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. ‘मतदान कोणाला करावे याचा सर्वस्वी निर्णय मतदाराचा आहे. मात्र, ते कोणाला केले हे इतरांना कळू नये तसेच मतदारालाही कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी ईव्हीएमच्या भोवती बॉक्स केले जाते. तसेच मतदाराने मतदान कक्षात मोबाईल घेऊन जाऊ नये यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकारयांकडून सूचना करण्यात येतात. असे असताना अनेक मतदारांनी उत्साहाच्या भरात मतदान करतानाचे फोटो काढले असून हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मत देतानाफेसबुक लाईव्ह

उस्मानाबादच्या एका तरुणाने चक्क फेसबूक लाईव्ह करत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे समोर आले आहे. हे फोटो फेसबुकवर टाकतानादादा तुमचा विजय निश्चित, ‘दादा तुम्हीच असे उल्लेख केले आहेत. निवडणूक आयोगाच्या कर्मचारयांनी या तरूणाला पकडले असून त्याने काढलेला व्हीडिओ फेसबुकवरून डीलीट करण्यात आला आहे.

मागे

एका अतिउत्साही मतदाराने उमेदवाराला दाखवण्यासाठी मतदानावेळी केले फेसबुक लाईव्ह
एका अतिउत्साही मतदाराने उमेदवाराला दाखवण्यासाठी मतदानावेळी केले फेसबुक लाईव्ह

लोकसभा निवडणूकीच्या मतदानावेळी धाराशिवमध्ये एका अतिउत्साही तरुणाने मतदा....

अधिक वाचा

पुढे  

मराठी.. मराठी.. करणा-या शिवसेनेची मराठय़ांशी फारकत
मराठी.. मराठी.. करणा-या शिवसेनेची मराठय़ांशी फारकत

मराठी माणसांच्या हितासाठी, मराठी माणसांच्या भल्यासाठी शिवसेनेची स्थापना ....

Read more