ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लोकसभेसाठी आम्हीच शिवसेनेला मदत केली मुख्यमंत्री भाजपचाच असेल - गिरीष महाजन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 22, 2019 05:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लोकसभेसाठी आम्हीच शिवसेनेला मदत केली मुख्यमंत्री भाजपचाच असेल - गिरीष महाजन

शहर : मुंबई

राज्यात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता शिगेला लागली असताना मुख्यमंत्री कोणाचा असावा, याचीच जास्त स्पर्धा लागलेली दिसून येत आहे. सध्या भाजप-शिवसेना युतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री भाजपचा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत युती होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शिवसेनेने आमचाच मुख्यमंत्री असेल असे म्हटले आहे. आता भाजपही मागे नाही. मुख्यमंत्री पद हे भाजपचेच असेल. भाजपचाच हक्क आहे आणि तो राहिल, असे म्हटले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री भाजपचा असेल असे म्हटले आहे.

आम्हीच शिवसेनेला मदत केली!

लोकसभा लढताना भाजपच्या जागा निवडून द्या असच आम्ही म्हणालो नाही. शिवसेनेच्या जागा निवडून आणण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले आहेत. ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत होती, त्याठिकाणी आमची भाजपची टीम होती.आमच्या सगळ्यांची भूमिका आणि भावना मुख्यमंत्री भाजपचा राहावी, अशी आहे. मोठ्या भावाची आमची भूमिका आहे. निकाल राज्यातले बघितले तरी कोणाचा मुख्यमंत्री असावा, हे सांगण्याची गरज नाही, असे गिरीश महाजन म्हणालेत.

दरम्यान, मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ लागलेली दिसत आहे. मध्यंतरी दानवे यांनी भाजपचा मुख्यमंत्री असेल असे म्हटले होते. त्यावेळी शिवसेनेकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला होता. यावेळी त्यांनी सावध भूमिक घेतली आहे. आता गिरीश महाजन यांनीही भाजपचाच मुख्यमंत्री म्हटले आहे. मात्र, शेवटी त्यांनी कोणताही वाद होऊ नये म्हणून अंतिम निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील असे म्हणत सावरुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.

 

मागे

शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडू- उद्धव ठाकरे
शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडू- उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या आणि त्यांना लुबाडणाऱ्या बँका आणि कंपन्यांची....

अधिक वाचा

पुढे  

मराठी माणसाला मुंबईबाहेर ढकलण्याचा विखे-पाटलांचा डाव
मराठी माणसाला मुंबईबाहेर ढकलण्याचा विखे-पाटलांचा डाव

गृहनिर्माण मंत्री झाल्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबई शहरातील म्हा....

Read more