ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे नेमकं काय?

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: नोव्हेंबर 07, 2019 03:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे नेमकं काय?

शहर : मुंबई

भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवर रस्सीखेच अजूनही सुरुच आहे. सत्ता स्थापनेला विलंब झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला राष्ट्रपती राजवट लागू होईल,असा इशारा दिला होता. मुनगंटीवारांच्या या वक्तव्याला शिवसेना नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.

राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे नेकमं काय, त्याचे सामान्य लोकांवर काय परिणाम होऊ शकतात आणि महाराष्ट्रात कधी आणि का राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली? हे जाणून घ्या.

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

  • देशातील कोणत्याही राज्यात शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्य नसल्याचा अहवाल संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा तसा अहवाल नसतानाही राष्ट्रपतींची स्वत:ची तशी खात्री पटली, तरी राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करु शकतात.
  • राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून बहुतांश वेळा राज्यपालच राज्याचे शासन चालवतात.
  • संविधानाच्या कलम 356 नुसार, एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतींने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते.
  • राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणे आवश्यक असते.
  • संविधानाच्या कलम 365 नुसार, एखादे राज्य सरकार केंद्राच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यासही त्या संबंधित राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करणे शक्य असते.
  • राष्ट्रपती राजवटीतही उच्च न्यायालयाचे अधिकार अबाधित असतात.
  •  
  • संसदेच्या मंजूरीनंतर सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते.
  • संसदेने पुढील सहा महिन्यांसाठी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवता येऊ शकतो.
  • संसदेची मान्यता मिळत असली, तरीही कोणत्याही राज्यात जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करणे शक्य असते.
  • राष्ट्रपती राजवटीत न्यायालयीन वगळता राज्याची सर्व सत्ता राष्ट्रपतींच्या हाती असते.
  • राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहाय्याने शासन चालवतात.
  • राष्ट्रपती राजवटीत संबंधित राज्याच्या विधिमंडळाची कार्ये, अधिकार संसदेकडे सोपवले जातात.
  • राष्ट्रपती स्वतः आदेश देऊन राज्य सरकारच्या सेवेतील कोणत्याही अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगू शकतात.
  • लोकसभेची बैठक नसल्यास राज्याच्या संचित निधीतून पैसा खर्च करण्याचा आदेश राष्ट्रपती त्या कालावधीमध्ये देऊ शकतात.
  • संबंधित राज्याच्या विधानसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो.

 

राष्ट्रपती राजवट आणि महाराष्ट्र (What is President’s rule)

  • महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट दोनवेळा लावण्यात आली होती.
  • महाराष्ट्रात पहिल्यांदा 1980 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
  • त्यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकार बरखास्त करण्यात आले होते. बरखास्तीनंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या.
  • त्यावेळी महाराष्ट्रात 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 पर्यंत राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते.
  • महाराष्ट्रात दुसऱ्यांदा 2014 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
  • 2014 मध्ये 32 दिवसांसाठी अर्थात 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
  • त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील नवं सरकार सत्तेवर येईपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू होती.

2014 मध्ये राष्ट्रपती राजवट का होती?

2014 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले. राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानं ते सरकार अल्पमतात आलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यापालांच्या शिफारशीवरून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

मागे

मोदी-शहा बैठक संपली, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपाती तयारी
मोदी-शहा बैठक संपली, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपाती तयारी

शिवसेनेने पाठिंबा न दिल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपाती तयारी ....

अधिक वाचा

पुढे  

'राज्यपालांशी चर्चा केली, आता भाजप निर्णय घेईल'
'राज्यपालांशी चर्चा केली, आता भाजप निर्णय घेईल'

'खाती कमी मिळाली तरी चालतील, पण मुख्यमंत्रीपद हवेच' अशी शिवसेना पक्षप्रम....

Read more