ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

टी-२० मालिकेसाठी शिखर धावनला डच्चू

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 27, 2019 05:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

टी-२० मालिकेसाठी शिखर धावनला डच्चू

शहर : delhi

येत्या ६ डिसेंबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणार्‍या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. यात भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज शिखर धवनला डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील एका सामन्यात झेल पकडताना शिखर धवनच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. त्याच्या गुडघ्याला २० टाके घालावे लागले आहेत. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकानं काल त्याची फिटनेस टेस्ट केली. धावणं पूर्ण बरा होण्यासाठी आणखी काही वेळ लागेल, आस तपासणीनंतर डॉक्टरांनी संगितले. डॉक्टरांच्या अहवालानंतर त्याला टी-२० मालिकेतून वगळण्याच्या निर्णय घेण्यात आला.

या तीन सामन्यातील पहिलं सामना ६ डिसेंबर रोजी हैद्राबादला होणार आहे. दूसरा सामना ८ डिसेंबरला तिरूअनंतपुरम मध्ये तर अखेरचा सामना ११ डिसेंबरला मुंबईत खेळवला जाणार आहे.

टी-२० मालिकेचा भारतीय संघ विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, संजू सॅमसन.

मागे

धोनीच्या भविष्याबाबत प्रशिक्षक रवी शास्त्रींचं महत्त्वाचं वक्तव्य
धोनीच्या भविष्याबाबत प्रशिक्षक रवी शास्त्रींचं महत्त्वाचं वक्तव्य

टीम इंडियाने बांगलादेशला टेस्ट सीरिजमध्ये २-०ने मात दिली. या सीरिजची शेवटच....

अधिक वाचा

पुढे  

एमएस धोनीने अखेर निवृत्तीच्या प्रश्नावर मौन सोडलं
एमएस धोनीने अखेर निवृत्तीच्या प्रश्नावर मौन सोडलं

एमएस धोनीने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांवर अखेर भाष्यं केलं आहे. आंतरराष्....

Read more