ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 27, 2020 10:48 AM 2019-02-12T14:15:30+5:30

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

शहर : मुंबई

टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाच्या आगामी दौऱ्यासाठी घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या दौऱ्यात मुंबईचा रोहित शर्मा या स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रोहितला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये वगळण्यात आले आहे. या टीम इंडियात काही युवा खेळाडूंनाही स्थान देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी हा संघ जाहीर करण्यात आला आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आज युएईमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी निवड समितीचे अध्यक्ष सुनील जोशी यांच्याशी चर्चा करून हा संघ निवडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी निवडवण्यात आलेल्या संघांमध्ये नवदीप सैनी आणि वरुण चक्रवर्ती यांनाही स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही युवा खेळाडू या संधीचे काय करतात याकडे लक्ष लागले आहे.

टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट मालिका खेळणार आहे. टीम इंडियात रोहित शर्मासह वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यालाही वगळण्यात आले आहे. बीसीसीआयचा वैद्यकीय चमू या दोघांच्या दुखापतींवर लक्ष ठेवून आहे. सध्याच्या घडीला रोहित आणि इशांत यांना आयपीएलमध्ये दुखापत झाल्याने त्यांना वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे. रोहित आणि इशांत दुखापतीमधून कसे सावरतात आणि कधी पूर्णपणे फिट होतात, याकडे बीसीसीआयचे लक्ष असणार आहे, असे सांगण्यात येत आहे

टीम इंडिया वनडे संघ :

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार, विकेटकिपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

टीम इंडिया टी -२० संघ :

विराट कोहली (कर्णधार), शिखर, मयंक अग्रवाल, केएल राहुल  (उपकर्णधार, विकेटकिपर), श्रेयस अय्यर, मनीष, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती

टीम इंडिया कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर, अजिंक्य  रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, साहा (विकेटकिपर), वृषभ पंत (विकेटकिपर), बुमराह, मोहम्मद. शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज

 

मागे

Kapil Dev | तुम्हा सर्वांचे आभार, कपिल देव यांचं रुग्णालयातून ट्वीट
Kapil Dev | तुम्हा सर्वांचे आभार, कपिल देव यांचं रुग्णालयातून ट्वीट

ज्येष्ठ क्रिकेटर कपिल देव यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे (Kapil Dev Tweet). त्यांन....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2020 MI vs RCB : पोलार्डच्या नेतृत्वात मुंबईची बंगलोरशी झुंज; आजच्या सामन्याची प्लेइंग इलेव्हन
IPL 2020 MI vs RCB : पोलार्डच्या नेतृत्वात मुंबईची बंगलोरशी झुंज; आजच्या सामन्याची प्लेइंग इलेव्हन

आयपीएल २०२० चा 48 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात....

Read more