ठळक बातम्या आपल्या घरात देखील आहे का नकारात्मक ऊर्जा ? तर हे 5 ऊपाय नक्की करून बघा.....    |     तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |    

IPL 2020 | 'आयपीएल 2020' यूएईमध्ये रंगणार, तारखांची घोषणा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 25, 2020 12:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2020 | 'आयपीएल 2020' यूएईमध्ये रंगणार, तारखांची घोषणा

शहर : मुंबई

आयपीएल 2020 चा 13 वा मौसम यूएईमध्ये खेळवला जाणार आहे. ‘बीसीसीआयने 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल 2020 खेळवण्याचे निश्चित केले. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी तारखांची घोषणा केली, मात्र सरकारची मंजुरी प्रलंबित असल्याची माहिती आहे. आयपीएलचं बिगुल 19 सप्टेंबर म्हणजे आजपासून बरोबर 57 दिवसांनी वाजणार आहे. आयपीएलमधील सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 वाजता (यूएईच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता) सुरू होण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे आयपीएलची संपूर्ण टुर्नामेंट रंगणार आहेक्रिकेटपटूना कमी थकवा, तर ब्रॉडकास्टरना अधिक कमाईसाठी उपयुक्त असतील, ब्रिजेश पटेल म्हणाले.

विविध भागधारकांशी सल्लामसलत करुन, आवश्यक त्या सर्व बाबींचा विचार करुन आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्हाला सरकारकडून अधिकृत प्रतिसाद मिळाल्यानंतर औपचारिकरित्या प्रशासकीय समिती बोलविली जाईल. पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला हे होईल, अशी आम्हाला आशा आहेअसे ब्रिजेश पटेल म्हणाले.

आयपीएल 2020’ साठी यूएईच का?

भारताला कोरोनाचा मोठा फटका बसला असून बहुतांश शहरांना त्यातून सावरण्यासाठी मोठा काळ लागू शकतो, या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनेआयपीएल 2020’ भारताबाहेर नेण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या.

यूएईमध्ये क्वारंटाईनचे नियम कडक नाहीत, तेथील बाजारपेठा आणि मॉल्स आधीच खुले झाले आहेत. कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थिती आहे आणि पर्यटकांचेही स्वागत केले जात आहे. त्यातच यूएईमध्ये आयपीएल खेळवण्यास विरोध करणाऱ्या जनहित याचिकाही स्थानिक कोर्टात दाखल होण्याची चिन्हं कमी आहेत.

यंदाच्या आशिया चषकाचं आयोजन रद्द करण्यात आल्याची माहितीबीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दिली होती.

क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली टी20 लीगआयपीएल 2020’ मार्चपासून सुरु होणार होती, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र जगभरातील क्रिकेट चाहत्यांचा हासणदोन  महिन्यात भेटीला येत आहे.

मागे

Corona : कोरोनामुळे पुढे ढकलेल्या ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर
Corona : कोरोनामुळे पुढे ढकलेल्या ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर

कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टोकयो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा ....

अधिक वाचा

पुढे  

'विराट कोहलीला अटक करा', मद्रास हायकोर्टात याचिका दाखल
'विराट कोहलीला अटक करा', मद्रास हायकोर्टात याचिका दाखल

विराट कोहलीला अटक करण्याची मागणी करणारी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण....

Read more