ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2020: विराट कोहलीने 'या' खेळाडूवर फोडले RCBच्या पराभवाचे खापर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 07, 2020 09:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2020: विराट कोहलीने 'या' खेळाडूवर फोडले RCBच्या पराभवाचे खापर

शहर : मुंबई

आयपीएलमधील एलिमिनेटर सामन्यात (Eliminator 2020) हैदराबाद सनराजर्स संघाकडून (Sunrisers Hyderabad) पराभूत झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहली चांगलाच वैतागलेला दिसला. फलंदाजांचे अपयश आणि निर्णायक क्षणी गचाळ क्षेत्ररक्षण झाल्यामुळे बंगळुरुला हा सामना गमवावा लागला. या पराभवासाठी विराट कोहलीने देवदत्त पडिक्कल याला जबाबदार धरले. पडिक्कलने केन विल्यमसनचा झेल पकडला असता तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, असे कोहलीने म्हटले.

बंगळुरुने अवघ्या 132 धावांचे लक्ष्य उभारुनही हैदराबादला विजयासाठी बराच संघर्ष करावा लागला. 18 व्या षटकात नवदीप सैनी याचा फुलटॉस चेंडू केन विल्यम्सनने फ्लिक केला. तेव्हा सीमारेषेवर उभ्या असलेल्या देवदत्त पडीक्कलने झेल पकडला पण त्याला संतुलन राखता आले नाही. त्यामुळे सीमारेषेपलीकडे जाण्यापूर्वी देवदत्त पडीक्कलने चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला. यामुळे हा झेल सुटला. यामुळे त्याने पाच धावा वाचवल्या असल्या तरी केन विल्यम्सनला जीवदान मिळाले. या जीवदानाचा फायदा उठवत केन विल्यम्सनने हैदराबादला विजय मिळवून दिला.

या सामन्यानंतर विराट कोहलीने बंगळुरुच्या फलंदाजीविषयीही नाराजी व्यक्त केली. गेल्या काही सामन्यांपासून बंगळुरुचे फलंदाज सातत्याने अपयशी ठरत होते. कालच्या सामन्यात विराट कोहलीने सलामीला येऊन प्रयोग करुन बघितला. मात्र, त्याला अवघ्या पाच धावांवर माघारी परतावे लागले. आम्ही चांगली धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरलो. दुसऱ्या सत्रात आमची स्थिती चांगली होती. मात्र, आम्हाला त्याचे रुपांतर मोठ्या धावसंख्येत करता आले नाही, अशी खंत विराट कोहलीने बोलून दाखवली.

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात हैदराबादने बंगळुरुचा सहा गडी राखून पराभव केला. बंगळुरुने हैदराबादला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादने हे विजयी आव्हान 19.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्स राखून पूर्ण केले. केन विल्यमसन आणि जेसन होल्डर हे दोघे हैदराबादच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 65 धावांची विजयी भागीदारी केली. केन विल्यमसनने नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर जेसन होल्डरने 24 धावांची महत्वाची खेळी केली. त्यामुळे आता 8 नोव्हेंबरला होणाऱ्या क्वालिफायर 2 सामन्यात हैदराबाद आणि दिल्ली एकमेकांना भिडतील.

                     

मागे

IPL 2020: जसप्रीत बुमराहची कमाल, दिल्लीवर 57 धावांनी मात, मुंबईची सहाव्यांदा फायनलमध्ये धडक
IPL 2020: जसप्रीत बुमराहची कमाल, दिल्लीवर 57 धावांनी मात, मुंबईची सहाव्यांदा फायनलमध्ये धडक

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 57 धावांनी मात करत आयपीएलच्....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2020 | अश्विनला दोन वर्षात हटवलं, एकही ट्रॉफी न जिंकता कोहली आठ वर्ष कर्णधार का? : गंभीर
IPL 2020 | अश्विनला दोन वर्षात हटवलं, एकही ट्रॉफी न जिंकता कोहली आठ वर्ष कर्णधार का? : गंभीर

आयपीएलमधील  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आता विराट कोहलीच्या  पलिकडे जाऊन ....

Read more